निघोजे / क्रांतीकुमार कडुलकर : कुरणवाडी येथे मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीच्या वतीने देशी 50 झाडाचे वृक्षारोपण लाडक्या बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतिक रक्षाबंधनाचे औचित्य साधून जेष्ठ महिला सगुणा नाणेकर यांच्या हस्ते वृक्षाचे पुजन करून वृक्षारोपण करण्यात आले. (Nighoje)
शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले की, आपल्या स्मरणात बहीण भावाचे आणि रक्षाबंधनाचे अतुट नाते स्मरणात राहावे म्हणून आम्ही वृक्षारोपण केले. यामुळे पर्यावरण वाढीसही चालना मिळेल.ज्या बहीणीला भावाकडे जाण्यासाठी काही अपरिहार्य कारणांमुळे जाऊ शकत नाही.
अशावेळी पर्यावरण वाचवण्यासाठी बहीणीने ही भावाप्रमाणे पुढाकार घेऊन आपल्याला शक्य तेवढे जमेल त्या वेळी रक्षाबंधनाची आठवण म्हणून झाडे लावून ते जगवावेत. आणि आपल्या एकमेकांना काही भेट वस्तू द्यायची असेल तर सुरक्षिततेसाठी हेल्मेट देण्याचे जोगदंड यांनी बहीण भावांना आवाहन केले.
तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा, सोयरे वनचरे या उक्तीप्रमाणे आपल्या स्वतःच्या पडीक गायरान जागेत आंबे, चिंच, जांभूळ फळ देणारी देशी झाडे लावून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे, असे मत संस्थेचे खेड अध्यक्ष शंकर नाणेकर यांनी व्यक्त केले. पुढे असे नाणेकर म्हणाले कि तुम्ही पर्यावरणाची धरा कास, तरच होईल आपला.
यावेळी निघोजेच्या सरपंच सुनीता येळवंडे म्हणाल्या की, आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने मागेल त्यांना आम्ही झाडे देतो आणि नागरीकांनी जगवल्यानंतर तीन वर्षांनी ग्रामपंचायतचे सदस्य पाहणी करतात आणि ते झाड जगवले असेल त्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करून त्यांना रोख रक्कम दिली जाते असा अभिनव उपक्रम आमची ग्रामपंचायत राबवीत आहे. (Nighoje)
यावेळी शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, खेडचे अध्यक्ष शंकर नाणेकर, सरपंच सुनिता येळवंडे, उपसरपंच छाया येळवंडे, विविध सोसायटीचे अध्यक्ष कैलास येळवंडे, उद्योजक नामदेव नाणेकर, वृक्षमित्र कैलास येळवंडे, एचडीएफसीचे शाखा व्यवस्थापक सोपान नाणेकर, ग्रामपंचायत सदस्य सागर येळवंडे, सगुणा नाणेकर, मानवी हक्क संरक्षण जागृतीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा संगिता जोगदंड, उद्योजक बाजीराव येळवंडे गुणवंत कामगार काळुराम लांडगे, विजय कोतवाल, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.