Friday, September 20, 2024
Homeआंतरराष्ट्रीयTrap Movie : श्यामलनच्या 'ट्रॅप'मध्ये कमी पडलेली कल्पनाशक्ती

Trap Movie : श्यामलनच्या ‘ट्रॅप’मध्ये कमी पडलेली कल्पनाशक्ती

Trap Movie : हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक एम. नाईट श्यामलन यांनी अलीकडेच इन्स्टाग्रामवर त्यांच्या एका चाहत्यासोबतचा एक मजेशीर अनुभव शेअर केला. या चाहत्याने त्यांच्या ‘सायन्स’ (2002) या कल्ट क्लासिक चित्रपटातील भयानक दृश्याचा फोटो असलेला फलक दाखवला होता. या फलकावर ‘Thank you for the childhood trauma’ असे कॅप्शन लिहिलेले होते.

श्यामलनचा नवीन चित्रपट ‘ट्रॅप’ (Trap Movie) मात्र त्यांच्या चाहत्यांना अपेक्षेप्रमाणे भितीचा अनुभव देण्यात अपयशी ठरला आहे. श्यामलन, ज्यांनी एकेकाळी हॉलीवूडमध्ये आपल्या अनोख्या दिग्दर्शनाने आणि कथानकाने धक्का देणारे चित्रपट दिले होते, त्यांची सध्याची सर्जनशीलता ओसरल्याचे चित्र त्यांच्या या नवीन चित्रपटात दिसते.

‘ट्रॅप’ या चित्रपटाची कहाणी कूपर (जोश हार्नेट) या व्यक्तीची आहे, जो आपल्या मुलीला (अरियल डोनोग) तिच्या आवडत्या पॉप गायिका लेडी रेव्हन (सलेका श्यामलन) हिच्या कॉन्सर्टला घेऊन जातो. मात्र, कॉन्सर्टमध्ये एक मोठा ट्विस्ट असतो – कूपरच तो खून करणारा सिरीयल किलर असतो, ज्याला पकडण्यासाठी एफबीआयने एक जाळं रचलेलं असतं.

Trap Movie

श्यामलनच्या या चित्रपटात ट्विस्टचा अभाव असल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी पसरली असून, एकेकाळी भयपटांच्या दिग्दर्शनासाठी ओळखले जाणारे श्यामलन आता त्याच पातळीवर असमर्थ असल्याचे जाणवत आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : जुन्नर येथील इंगळून घाटात दरड कोसळली, या गावांचा संपर्क तुटला

मोठी बातमी : संसदेतील ‘त्या’ भाषणानंतर राहुल गांधींवर ईडीची छापेमारी होणार ?

Jio, Airtel चे टेन्शन वाढले ; TATA आणि BSNL मध्ये मोठा करार

ब्रेकिंग : माझी लाडकी बहीण योजने संदर्भात नवीन माहिती समोर

मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास

भावडांसोबत खेळताना दोरीचा फास लागून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

ब्रेकिंग : शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार, वाचा कशाचा आहे त्रास !

मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीने इतिहास रचला, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले

संबंधित लेख

लोकप्रिय