Sunday, May 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : चिंचवड गाव येथील वस्ताद स्वर्गीय बाळासाहेब विठोबा गावडे जलतरण तलाव तातडीने सुरू करण्याची जनसेवक मधुकर बच्चे यांची मागणी

पिंपरी चिंचवड – चिंचवड गाव येथील वस्ताद स्वर्गीय बाळसाहेब विठोबा गावडे जलतरण तलाव गेल्या पंधरा दिवसापासून बंद आहे. त्यामुळे अनेक लोकांचे त्यामुळे हाल होत आहेत, आधीच पास काढलेले लोक अडकले तर नवीन लोकांना समजेना नक्की कुठे पास काढावा. (PCMC)

खर तर करदात्यांच्या पैशातून हे सर्व व्यवस्थित होणे अपेक्षित आहे परंतु प्रशासनाकडून यात फक्त चाल ढकल व निष्काळजी पणा करताना दिसत आहे.या तलावात फक्त पोहणे एवढेच नसते तर व्यायाम व अनेकांना सराव महत्वाचा आहे पण प्रशासन आजिबात गांभीर्याने घेताना दिसत नाही. या तलावातील फिल्टरिंग खराब झाल्याचे नावाने गेले पंधरा दिवस बंद ठेवणे म्हणजे नागरिकांची घोर फसवणूक आहे.

आता सुट्ट्यामुळे शाळेतील कॉलेजातील मुले – मुली पोहण्यासाठी आतुर असताना या जलतरण तलावाची दुर्दश्या पाहून मोठा भ्रमनिराश होत आहे. (PCMC)

वूई टूगेदर फाउंडेशनच्या वतीने व अध्यक्ष मधुकर बच्चे यांच्या पुढाकाराने क्रीडा सहाय्यक आयुक्त पंकज पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.
विशेष म्हणजे विद्युत कडून दिरंगाई होते असे समजल्यावर आम्ही विद्युत विभागाकडे सुधा पाठपुरावा करीत आहोत हे काम क्रीडा विभागाचे असून सुधा आम्हीच करीत आहोत.
मा. पाटील साहेब यांनी त्वरित युद्ध पातळीवर निर्णय घेऊन तलाव त्वरित सुरु करावा अन्यथा वूई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने नागरिकांना सोबत घेऊन आगळे वेगळे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदन दिले आहे.

आठ दिवसात हा जलतरण तलाव सुरु करण्याचा प्रयत्न राहील असे आश्वासन पाटील साहेब यांनी शिष्टमंडळास दिले आहे. असे वुई टूगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी सांगितले.
या शिष्टमंडळात मधुकर बच्चे, सलीम सय्यद, दिलीप चक्रे, जयंत कुलकर्णी, रवींद्र काळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

---Advertisement---

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles