Monday, December 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडव्हिडिओ : केजरीवाल यांच्या घराची तोडफोड, पिंपरीत निषेध आंदोलन

व्हिडिओ : केजरीवाल यांच्या घराची तोडफोड, पिंपरीत निषेध आंदोलन

पिंपरी चिंचवड : पोलिसांच्या संगनमताने भाजपच्या गुंडांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानी दिवसाढवळ्या तोडफोड केल्याच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर समितीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे जोरदार निदर्शने केली.

सुरक्षा कवच तोडून, सीसीटीवी व इतर संसाधनांची नासधूस करत मुख्यमंत्र्यांच्या जीवितास घातपात करण्याचा भाजपने  प्रयत्न केला आहे, देशातील लोकशाही मूल्याची पायमल्ली करणारे हे घृणास्पद कृत्य आहे. भाजपने आमच्या पक्षाचा धसका घेतला आहे. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मोठा झटका, वकिलांवर ईडीचा छापा

आम आदमी पक्ष वैचारिक लढाईवर विश्वास ठेवतो. झुंडीच्या दहशतीचे राजकारण आम्ही या देशात चालू देणार नाही,आजची हि कृती म्हणजे भाजपने  विचारांच्या लढाईत पराभव स्वीकारल्याचे लक्षण आहे.” असे आम आदमी पार्टी चे पिंपरी चिंचवड कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी सांगितले आहे ‌‌‌.

या आंदोलनात राज चाकणे, स्वप्नील जेवळे, एकनाथ पाठक, ऍड.गौतम कुडुक, प्रकाश हगवणे, मोतीराम अगरवाल, ऍड.उमेश साठे, भीम मागाडे, अशोक कोठावळे, सरोज कदम, उमेश थोरात, डॉ. योगेश बाफना, ब्राम्हनंद जाधव, मुकेश पोखरकर, निखिल बालीघाटे, आशुतोष शेळके, चांद्रमनी जावळे, स्मिता पवार, शिव बोटे, शंकर पवार ई. कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 – क्रांतिकुमार कडुलकर


उंबराच्या झाडावर महिलेचा कुजलेला मृतदेह, घातपात कि अंधश्रद्धा ?

ब्रेकिंग : पेट्रोल डिझेल दरवाढ थांबेना, सलग नवव्यांदा वाढ

संबंधित लेख

लोकप्रिय