Friday, October 18, 2024
Homeजिल्हामोठी बातमी : पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट ; सर्व शाळा, महाविद्यालयांना...

मोठी बातमी : पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट ; सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

पुणे : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, २४ जुलै २०२४ आणि २५ जुलै २०२४ रोजी पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात सद्यस्थितीमध्ये जोरदार पाऊस होत असून, हवामान विभागाने पुढील काही तासांत पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी २५ जुलै २०२४ रोजी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. (Pune)

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माथ्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्याना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (Pune)

Red alert in Pune district

पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू असून, पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे, असे निर्देश दिले आहेत. (Pune)

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

मोठी बातमी : अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या दरात मोठी कपात, वाचा किती झाले कमी !

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

ब्रेकिंग : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मोठी बातमी : MPSC मार्फत सहयोगी प्राध्यापकासह विविध पदांसाठी मुलाखत

मोठी बातमी : संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर, वाचा अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा !

ब्रेकिंग : अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड

संबंधित लेख

लोकप्रिय