Friday, January 3, 2025
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : लेट पासिंग साठी वसूल केलेला लाखो रुपयाचा दंड परत करा...

PCMC : लेट पासिंग साठी वसूल केलेला लाखो रुपयाचा दंड परत करा – शुभम तांदळे

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या अंतर्गत फिटनेस सर्टिफिकेट पासिंग साठी दररोज पन्नास रुपये दंड (Penalty) आकारण्यात आला होता. (PCMC)

परंतु महाराष्ट्र रिक्षा पंचायत ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन, महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष गोरगरीब कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांचे नेतृत्वाखाली पुणे पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्रभर संघर्ष करून हा जुलमी दंड रद्द करून घेण्यास यश आले आहे.

महाराष्ट्र सरकारने विधानसभेमध्ये नुकतीच घोषणा करून लेट फिटनेस पासिंग साठी दररोज येणारा पन्नास रुपये रद्द करण्याची घोषणा केली असून याबाबत परिवहन विभागाने परिपत्रक काढून हा दंड रद्द केला आहे.

परंतु या दरम्यान अनेक रिक्षा व टॅक्सी चालकांनी नियमात व वेळेत पासिंग व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला पन्नास रुपये दररोजचा दंड भरून लाखो रुपये शासनाला भरले आहेत व नियमानुसार गाडीचे प्रमाणपत्र मिळवला आहे, महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने दंड रद्द केला असला तरी नियमानुसार पासिंग करून लाखो रुपये दंड भरणाऱ्या ऑटो टॅक्सी चालकांना त्यांनी भरलेला दंड परत मिळावा. (PCMC)

अशी मागणी महाराष्ट्र रिक्षा पंचायत प्रदेश युवक अध्यक्ष शुभम तांदळे यांनी पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांच्याकडे लेखी पत्रकाद्वारे केले आहे. (PCMC)

याबाबत त्यांनी पिंपरी चिंचवड येथील प्रादेशिक परिवहन कार्याला जाऊन त्यांची भेट घेऊन याबाबतची मागणी केली असून दंड कमी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय