Junnar : ओतूर (ता. जुन्नर) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या आण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयातील जेष्ठ सेवक उत्तम कारभळ याना नुकताच पुणे जिल्हा शालेय क्रीडा समितीच्या वतीने विशेष प्रशासकीय कर्मचारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
उत्तम करभाळ यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व प्रशासकीय कार्यातील उल्लेखनीय कामाबद्दल वाघिरे महाविद्यालय व शालेय क्रिडा समिति पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मानित करून गुणगौरव करण्यात आला. (Junnar)
त्यांच्या या यशाबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उप सचिव एल. एम. पवार, सहसचिव प्रशासन ए. एम. जाधव तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे, उप प्राचार्य डॉ. के. डी. सोनवणे, डॉ. रमेश शिरसाठ, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. अमर बनसोडे, क्रिडा विभाग प्रमुख डॉ. उमेश पनेरू सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व विद्यार्थी वृंद यांनी त्यांचे अभिनंदन केले.
हेही वाचा :
गर्भवती महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर राखेत सापडली धक्कादायक वस्तू, सर्वत्र खळबळ
मोठी बातमी : आता वारकऱ्यांना मिळणार पेन्शन, वारकरी महामंडळाची स्थापना
मोठी बातमी : अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचारसभेदरम्यान गोळीबार
धक्कादायक : अंगणवाडीत शाळेत पोषण आहारात आढळले बेडक
निवासी आदिवासी आश्रमशाळांची वेळेबाबत आदिवासी विकास मंत्री काय म्हणाले पहा !