Monday, December 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडदोन वर्षानंतर गुढी पाडव्याच्या भव्य शोभायात्रा, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दोन वर्षानंतर गुढी पाडव्याच्या भव्य शोभायात्रा, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी चिंचवड : शहरातील नागरिक, सामाजिक संस्था राजकीय प्रतिनिधींनी संयुक्तपणे गुढी पाडव्याच्या शोभायात्रा काढण्यात आल्या. संस्कृती संवर्धन व विकास महासंघ, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने फुलेनगर, संभाजीनगर, शाहूनगर या परिसरातून भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली.

दोन वर्षानंतर निघालेल्या शोभायात्रेत परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सायंकाळी 5 वाजता श्री गणपती मंदिर फुलेनगर येथून शोभायात्रेला सुरुवात झाली.श्री तुळजाभवानी मंदिर मार्गे, श्री रामेश्वर मंदिर, श्री दत्त मंदिर, स्वयंभु श्री गणपती मंदिर संभाजीनगर मार्गे, सुबोध विद्यालय, श्री सिद्धिविनायक मंदिर, शिवशंभो गार्डन जवळून काका हलवाई, शिवशंभो फाउंडेशन मार्गे महाबली मंदिर शाहूनगर मार्गे महालक्ष्मी मंदिर येथे शेवटचे मर्दानी प्रात्यक्षिक करून शोभायात्रेचा समारोप झाला. प्रत्येकांनी भगवा फेटा परिधान केला होता.ढोल ताशे वाजवत नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले.

या शोभयात्रेमध्ये लहान मुलांनी श्रीराम, लक्ष्मण, सीता, कोणी छत्रपती शिवाजी महाराज, कोणी झाशीची राणी, राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा केली होती. यानिमित्त समाज प्रबोधनात्मक संदेश, आपली संस्कृती चालीरीती कश्या जपासावे याचा एक चांगल्या प्रकारे प्रबोधन करण्यात आले. 

यामध्ये भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी उपमहापौर तुषार हिंगे यांच्यासह परिसरातील सर्व राजकीय, सामाजिक, लोकप्रतिनिधी, महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ, प्रतिष्ठान यांनी सहभाग घेतला.


संबंधित लेख

लोकप्रिय