Nitish Kumar : लोकसभा निवडणूक-2024 मध्ये इंडिया अलायन्सने 234 जागा मिळवल्या. भाजपने 240 जागा जिंकल्या आहेत आणि एनडीएने 293 जागा जिंकल्या आहेत, त्यापैकी नितीश कुमार यांच्या पक्ष जनता दल युनायटेडने 12 जागा जिंकल्या आहेत आणि टीडीपीने 16 जागा जिंकल्या आहेत. एनडीएला मिळालेल्या बहुमताच्या आधारे नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहे. अशात आता खळबळजनक बातमी येत आहे.
2024 च्या लोकसभा निवडणूकीत इंडिया आघाडीने चांगली कामगिरी केली आहे. सध्या इंडिया आघाडीकडे 234 संख्याबळ आहे. एनडीए किंवा इंडिया आघाडीला सरकार स्थापन करायचे असल्यास त्यांना नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची गरज आहे. एनडीए सोबत इंडिया आघाडीने देखील सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. अशात नितीश कुमार यांना इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदाची ऑफर मिळाल्याचा दावा जेडीयूच्या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
Nitish Kumar यांना पंतप्रधानपदाची ऑफर
जेडीयू नेते केसी त्यागी यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना म्हणाले की, निवडणुकीचे निकाल आल्यानंतर नितीश कुमार यांना इंडिया आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, पण त्यांनी ती नाकारली. असे विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे.
केसी त्यागी पुढे म्हणाले की, INDIA आघाडीच्या नेत्यांनी नितीश कुमार यांना दिलेल्या वाईट वागणुकीमुळे त्यांनी विरोधकांशी संबंध तोडले आहेत. त्याचवेळी भाजप जेडीयूला मान देत आहे. जेडीयूने दोन मोठ्या मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. सैन्य भरतीसाठी अग्निवीर योजनेचा आढावा घेण्याच्या बाजूने आहेत आणि समान नागरी संहितेवर सर्व राज्यांशी चर्चा करू शकतात. राष्ट्रीय स्तरावर जातीवर आधारित जनगणना करण्याचीही जेडीयूची अपेक्षा आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. मात्र, जेडीयू आणि टीडीपीने एनडीए सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला पाठिंबा दिला आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते ११ जून दरम्यान हाय अलर्ट
कंगना रणौतला थप्पड मारणाऱ्या महिलेला प्रसिद्ध गायकाकडून नोकरीची ऑफर
मोठी बातमी : शिंदेच्या शिवसेनेत पुन्हा भुकंप होणार ? अनेक आमदार ठाकरेंच्या संपर्कात
ब्रेकिंग : नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी टाकला बाँम्ब
मोठी बातमी : कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, RBI ने घेतला मोठा निर्णय !
लोकसभा निवडणुक संपली तरी ‘या’ मतदारसंघात राहणार आचारसंहिता, वाचा काय आहे कारण !
साफसफाई करताना पाण्यात “हे” वापरा , मुंग्या, झुरळ होणार नाहीत