Sunday, December 22, 2024
Homeराष्ट्रीयगुजरात मधील क्षमा बिंदूने केले स्वत: शी लग्न, लग्नाचे फोटो पाहिलेत का...

गुजरात मधील क्षमा बिंदूने केले स्वत: शी लग्न, लग्नाचे फोटो पाहिलेत का ?

वडोदरा : गुजरात मधील क्षमा बिंदूने बुधवारी स्वतःशी लग्न केले आहे. ती 11 जून रोजी लग्न करणार होती. या लग्नाला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर तिने ठरलेल्या तारखेच्या 3 दिवस आधीच लग्न केले आहे.

२४ वर्षांच्या क्षमाने वडोदराच्या गोत्री येथील घरात हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. क्षमाने मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राजकीय नेत्याच्या विरोधानंतर त्यांनी घरीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

क्षमाचे आई-वडील खुल्या विचारांचे आहेत, त्यामुळे त्यांनीही तिच्या या निर्णयास पाठिंबा देत लग्नात क्षमाला आशीर्वाद दिला. भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच विवाह असल्याचे सांगण्यात येत आहे. 

लग्न लावणाऱ्या पंडितानेही या लग्नाच्या विधीला नकार दिल्याने, क्षमाने टेपवर मंत्र वाजवून लग्न केले.

लग्नादरम्यान हळदी-कुंकवाचे विधी झाले, मेहेंदी सेरेमनीदेखील झाली. त्यावेळी क्षमाने स्वतःशी लग्नगाठ बांधली.

क्षमाला लग्न करण्याची कधीच इच्छा नव्हती, परंतू वधू बनण्याचे स्वप्न होते. त्यामुळेच तिने स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

संबंधित लेख

लोकप्रिय