Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याMPSC: लिपिक टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांची यादी जाहीर

MPSC: लिपिक टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांची यादी जाहीर

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३, मधील लिपिक टंकलेखक, गट-क या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन आरक्षणाचा दावा करणाऱ्या व अर्हताप्राप्त यादीत समावेश झालेल्या उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षाचा कालावधी व २ संधी अनुज्ञेय असल्यामुळे अशा उमेदवारांना टंकलेखन चाचणी अनिवार्य नाही.

पूर्व परीक्षेसाठीच्या आवेदनपत्रात ‘लिपिक टंकलेखक‘ संवर्गाचा विकल्प दिलेल्या व पूर्व परीक्षेतून अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांचाच शासनस्तरावर तपासणी करण्याच्या अधीन राहून या टंकलेखन कौशल्य चाचणीच्या निकालात समावेश करण्यात आला आहे.

टंकलेखन कौशल्य चाचणी अर्हताकारी / पात्रता स्वरुपाची असून त्याबाबत उमेदवारांना आयोगाच्या https://mpsc.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्दीपत्रकाद्वारे स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

Newsclick संपादक प्रबीर पुरकायस्थ यांची अटक बेकायदेशीर, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

खासदार नवनीत राणा यांच्या घरी चोरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एकूण किती संपत्ती, आकडेवारी एकूण व्हाल थक्क

मोठी बातमी : नारायणगावात महादेव बेटिंग ऍप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, 70 ते 80 जण ताब्यात

ब्रेकिंग : खर्च नोंदवही तपासणीसाठी सादर न केल्यामुळे दोन उमेदवारांवर गुन्हे दाखल

मोठी बातमी : विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

Ghatkopar hoarding tragedy: मृतांचा आकडा वाढला; 16 जणांचा मृत्यू

Tourism : उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जा, दक्षिण भारतात

नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस अंतर्गत भरती

संबंधित लेख

लोकप्रिय