रियाध : सौदी अरेबियामध्ये एका दिवसात दहशतवादी गुन्ह्यांसाठी 81 जणांना फाशी देण्यात आली आहे. दहशतवादाशी संबंधित विविध गुन्ह्यांसाठी एका दिवसात 81 जणांना फाशी देण्यात आली आहे.
दरम्यान असोसिएटेड प्रेस (AP) च्या हाआल्यानुसार शनिवारी ही सजा सुनावण्यात आली. दरम्यान, अधिकृत सौदी प्रेस एजन्सीच्या म्हणण्यानुसार, दोषी ठरलेले हे इस्लामिक स्टेट, अल-कायदा, हुथी आणि इतर दहशतवादी संघटनांशी संबंधित होते. ते महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले करण्याचा आणि शस्त्रास्त्रांची देशात तस्करी करण्याचा कट रचत होते.
सांगितले आहे.
फाशी देण्यात आलेल्या 81 लोकांपैकी 73 सौदीचे, 7 येमेनी आणि एका सीरियाचा नागरिकाचा समावेश आहे. मृत्युदंड देण्यात आलेल्या सर्वांवर सौदी न्यायालयात प्रत्येक व्यक्तीसाठी तीन वेगवेगळ्या टप्प्यांवर 13 न्यायाधीशांच्या देखरेखीखाली खटले चालवले गेले होते. हा आकडा 2021 मध्ये देशातील एकूण फाशीच्या संख्येपेक्षा जास्त आहे.
आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना हस्तांतरण होताच तात्काळ कारवाई होणार !
जुन्नरच्या आरती सासवडेची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड ! ओबीसी संवर्गातून राज्यात दुसरी