मुंबई : एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत महिला व बालकल्याण विभागाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
पोषण अभियान २०२० अंतर्गत जास्तीत जास्त यशस्वी उपक्रम राबविण्यात महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर असल्याचे ट्विट माहिती व जनसंपर्क संचालनालयाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच सक्षम महिला, सुदृढ बालक, सुपोषित महाराष्ट्र असल्याचे ही म्हटले आहे.
सदर ट्विटमध्ये जाहीर करण्यात आलेले निर्णय पुढील प्रमाणे :
● ५००० अंगणवाडी सेविका व मदतनीसांची रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली.
● आदिवासी भाग व आकांक्षित जिल्ह्यांत प्राधान्याने प्रकल्प अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत निर्णय घेण्यात आला
● कोवीड – १९ च्या कालावधीत ७५ लाख लाभार्थ्यांना घरपोच कच्चे धान्य व किराणा मालाचे वाटप अंगणवाडी केंद्र प्रति महिने भाडे वाढ पुढीलप्रमाणे होणार
१. महानगर क्षेत्रात – रुपये ७५० वरून रु. ६०००
२. नागरी क्षेत्रात – रुपये ७५० वरून रु. ४०००
३. ग्रामीण क्षेत्रात – रुपये ७५० वरून रु . १०००
● नव्याने ९७ अंगणवाडी केंद्र व ७८५ मिनी अंगणवाडी केंद्र उघडण्यास मान्यता.
● प्रति वर्षे ५००० अंगणवाड्या स्मार्ट करण्याचा निर्णय.
● प्रत्येक जिल्ह्यात महिला व बाल विकास भवन कार्यान्वित करण्याचा निर्णय.
● Common Application Software ( CAS ) कामकाज पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना रुपये ५०० व मदतनीस यांना रुपये २५० प्रती महिना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार.