Saturday, April 13, 2024
Homeजुन्नरशाहीनशाहे जुन्नर यांचा 359 वा उर्स संपन्न

शाहीनशाहे जुन्नर यांचा 359 वा उर्स संपन्न

जुन्नर (रफिक शेख): जुन्नर येथील जागरूक देवस्थान हजरत इसहाक शाह काद्री शाहीनशाहे (र-ह) जुन्नर यांचा उर्स आज मोठ्या थाटात संपन्न झाला. शाहीनशाहे जुन्नर यांचा 359 वा हा उर्स आयोजित करण्यात आला होता.

शाहीनशाहे जुन्नर यांच्या उर्ससाठी देरगेला मानणारा मोठा वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमावेळी जुन्नरचे तहसीलदार रविंद्र सबनीस, जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक किरण अवचर, पीएसआय दिलिप पवार, एएसआय अनिल लोहकरे यांनी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, ऍड. जमीर भाई कागदी, सुलतान भाई, वरीस भाई व नातखा रफिक भाई काद्री, सिराज भाई पिरजादा, कुमेल अहेमद उपस्थित होते. तसेच दरग्याचे ट्रस्टी कुतबे, आलम पिरजादे यांनी सर्वांचे आभार मानले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय