मोरोक्को : शुक्रवारी रात्री उशिरा मोरोक्कोमध्ये शक्तिशाली भूकंप झाला, त्यामध्ये शेकडो लोक ठार झाल्याचे वृत्त असोसिएटेड प्रेसने दिले आहे. अॅटलस पर्वतातील गावांपासून ते ऐतिहासिक शहर मॅराकेचपर्यंत इमारतींचे नुकसान झाले. 296 dead, hundreds injured in Morocco after massive earthquake
मोरोक्कोच्या गृह मंत्रालयाने शनिवारी पहाटे सांगितले की, भूकंपाच्या जवळच्या प्रांतांमध्ये किमान 296 लोक मरण पावले आहेत. याशिवाय 153 जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री 11.28 वा 6.8 रिष्टर स्केलच्या भूकंपाने ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू मॅराकेचच्या दक्षिणेस सुमारे 70 किलोमीटर (43.5 मैल) ॲटलस पर्वतावर होता. हा केंद्रबिंदू उत्तर आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर तौबकल आणि प्रसिद्ध मोरोक्कन स्की रिसॉर्ट ओकेमेडेन जवळ आहे.
मोरोक्को, उत्तर आफ्रिकेच्या माघरेब प्रदेशातील एक देश आहे. अटलांटिक महासागर व भूमध्य समुद्र ह्या दोन्हींवर किनारे असलेला मोरोक्को निसर्गसंपन्न आहे.


