Sunday, December 8, 2024
Homeआंतरराष्ट्रीयव्हिडिओ : G-20 शिखर संमेलन; परदेशी पाहुण्यांचे शाही स्वागत

व्हिडिओ : G-20 शिखर संमेलन; परदेशी पाहुण्यांचे शाही स्वागत

नवी दिल्ली : प्रगती मैदान परिसरातील अत्याधुनिक भारत मंडपम् कन्व्हेंशन सेंटरमध्ये ही शिखर परिषद होणार आहे. 20 देशांचे राष्ट्रप्रमुख तसेच सरकारप्रमुख या परिषदेत सहभागी झाले आहेत. G-20 Summit ; Royal welcome to foreign guests

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यान्युएल मैक’ाँ,जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ,ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानीज, जपानचे पंतप्रधान फिमियो किशिदो यांच्यासह अनेक राष्ट्रप्रमुख तसेच सरकारप्रमुख या परिषदेसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. 

जी-20 मध्ये चीन, फ्रान्स, भारत, ब्रिटन, इटली, जर्मनी, जपान, कॅनडा, रशिया, ब्राझील, तुर्किए, कोरिया, मेक्सिको, अमेरिका, अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, दक्षिण ऑफि’का, सौदी अरब आणि युरोपियन युनियन आदी देशांचा समावेश आहे. युरोपीयन युनियनमध्ये 27 सदस्य आहेत.

भारत मंडपम येथे आज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी 78 संगीतकार उपस्थित राहणार आहेत. संगीताच्या कार्यक्रमात शास्त्रीय संगीत गायनाबरोबर हिंदुस्थानी, कर्नाटक आणि लोकसंगीतातील वादनांचा समावेश असणार आहे. तर वाद्यांमध्ये रुद्र वीणा, सरस्वती वीणा, विचित्र वीणा, जलतरंग, नलतरंग, सूरबहार आदी वाद्ये असतील. भारताच्या विविधतेतील एकतेचे प्रतिक मानले जाणाऱ्या ‘मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा’ या गाण्याचे सादरीकरणदेखील होणार आहे. 

G20 चे खास थीम सॉंग करण्यात आलेले आहे. देशातील जवळपास सर्व राज्यांमधील हस्तकला आणि कला उद्योगांची उत्पादने प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत. यातून कारागिरांच्या व्यासपीठ मिळेल व त्यांना कलात्मक कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल, अशी सरकारला अपेक्षा आहे.

दिल्लीत कडेकोट सुरक्षा

दिल्ली पोलिसांच्या 50 हजार जवानांसह, पॅरामिलिट्री फोर्स, एनएसजी आणि सीआरपीएफ कमांडो तैनात करण्यात आले आहेत. दिल्लीतील उंच इमारतीवर एअरक्राफ्ट गन मशिन लावण्यात आल्या आहेत. प्रत्येक घटनेवर नजर ठेवण्यासाठी 40,000 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय