Thursday, December 12, 2024
Homeजिल्हाLadki bahin yojana : पुण्यातील 10 हजार महिलांचे अर्ज अपात्र ; काय...

Ladki bahin yojana : पुण्यातील 10 हजार महिलांचे अर्ज अपात्र ; काय आहे कारण?

Ladki bahin yojana : महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहे. मात्र, योजनेच्या अर्जांची छाननी केल्यानंतर पुणे जिल्ह्यातील 10 हजार महिलांचा अर्ज अपात्र ठरला आहे. यामुळे या महिलांना डिसेंबरच्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर, योजनेतील अर्जांची छाननी सुरू केली गेली आहे. यामध्ये विविध प्रकारच्या त्रुटी आढळल्याने अनेक अर्ज अपात्र ठरले आहेत. पुणे जिल्ह्यातून 21 लाख 11 हजार 363 अर्ज मंजूर झाले होते, पण त्यातील 12 हजार अर्जांची छाननी अजून बाकी आहे. या छाननीदरम्यान, 9 हजार 814 अर्ज अपात्र ठरले असून, 5 हजार 814 अर्ज किरकोळ त्रुटीमुळे नाकारण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अर्ज करतांना कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आयकर प्रमाणपत्र आणि निवृत्तिवेतन किंवा चारचाकी वाहन धारक असणाऱ्यांचा तपास करण्यात येत आहे. जर अर्जदाराची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाख रुपये ओलांडली, तर त्याचा अर्ज अपात्र ठरवला जात आहे. तसेच सेवानिवृत्त व्यक्तींचे पेन्शन किंवा चारचाकी वाहनधारक असलेल्या अर्जदारांनाही तपासले जात आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केली होती. परंतु, काही त्रुटीमुळे या योजनेचे लाभ मिळवण्याच्या प्रक्रियेत अडथळे येत आहेत. महिला बालकल्याण विभागाने अर्जदारांना त्रुटी सुधारण्यासाठी सूचना दिल्या आहेत, आणि योग्य कागदपत्र सादर केल्यास त्यांचा अर्ज मंजूर होऊ शकतो.

Ladki bahin yojana

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

धक्कादायक : पत्नीच्या छळाला कंटाळून इंजिनियरची आत्महत्या, तब्बल 24 पानांची लिहली सुसाईड नोट

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कहर, शाळांच्या वेळेत बदल

मोठी बातमी : ‘वेलकम’ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्याचे अपहरण, खंडणीसाठी 12 तास टॉर्चर

ब्रेकिंग : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या विविध परिक्षांचा निकाल जाहीर

बोगस इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करणाऱ्या कंपनीच्या सूत्रधारास अटक

बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम अंतर्गत 275 जागांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय