नवी दिल्ली : हरियाणा सरकारने एडीजीपी (CID) च्या अहवालाच्या आधारे डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीमची पेरोलवर तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्याला झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.
राम रहीमला खलिस्तान समर्थक कार्यकर्त्यांकडून जीवाला धोका असल्याचे सांगण्यात आले होते. त्याने ६ फेब्रुवारीला पत्र देऊन उच्च न्यायालयाला याची माहिती दिली होती. या पार्श्वभुमीवर हरियाणा सरकारने त्याची पेरोलवर तुरुंगातून सुटका केल्यानंतर त्याला झेड प्लस श्रेणीची सुरक्षा दिली आहे.
खडकी कॅन्टोनमेंट बोर्डा अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !
पंजाब निवडणुकीच्या काळातच राम रहीम 21 दिवसांसाठी पेरोलवर आहे, त्यामुळे विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहे. यावर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी राम रहीमला दिलेल्या दिलासाचा पंजाब निवडणुकीशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले आहे. मात्र, राम रहीम या निवडणुकीत प्रभाव पाडू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तर डेरा समर्थकांनी भाजपला मतदान करण्याचे आवाहन केल्याची माहिती आहे.
सिरसा येथील आश्रमात दोन महिला अनुयायांवर बलात्कार केल्या प्रकरणी राम रहीम (54 वर्षे) 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ऑगस्ट 2017 मध्ये या प्रकरणात राम रहीमला दोषी ठरवले होते. तसेच गुरमीत राम रहीमला डेरा माजी व्यवस्थापक रणजित सिंग यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे.
बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येवर अभिनेत्री रविना टंडनचे ट्वीट
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये विविध पदांसाठी भरती