पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : दि.२१ – जागतिक योग दिनाचे औचित्य साधून रहाटणी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यानात योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समस्त रहाटणीकरांनी एकत्रितपणे योगा करून जागतिक योग दिन साजरा केला.
याप्रसंगी माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, माजी स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर, सामाजिक कार्यकर्ते नरेश खुळे, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष दिलीप कुलकर्णी, धर्मवीर संभाजी महाराज गार्डन ग्रुपचे अध्यक्ष बाळकृष्ण गायकवाड व गार्डन ग्रुप चे सर्व सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी योग प्रशिक्षक महाराष्ट्र गुणवंत कामगार पारितोषिक विजेते बाळासाहेब साळुंके यांनी योगाचे प्रशिक्षण दिले.

यावेळी मार्गदर्शन करताना माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन म्हणाले की, प्रत्येकाने आपली जीवनशैली योगमय केली पाहिजे. आपले शरीर आणि मन सुंदर घडवायचे असेल तर प्रत्येकाने आपल्या दिवसाची सुरुवात योगाने केली पाहिजे. योगाचे महत्व आज संपूर्ण जगाने मान्य केले असून योगामुळेच आज आपला भारत देश हा विश्वगुरु म्हणून ओळखला जात आहे. ही बाब प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे.
‘महाराष्ट्र मिशन ड्रोन’ प्रकल्पाला तत्वतः मान्यता; अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये
Video : सिक्कीममध्ये भयंकर भूस्खलन झाल्याने रस्ते बंद, जवानांकडून ३५०० पर्यटकांची सुटका
ब्रेकिंग न्यूज : MPSC मध्ये राज्यात तिसरी, पण मित्रासोबत फिरायला गेली अन् घात झाला ; वाचून हादराल
