Friday, September 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपैलवानांचा न्यायासाठी लढा; राजकीय, मनोरंजन अन् क्रीडा क्षेत्रातून मिळतोय सपोर्ट

पैलवानांचा न्यायासाठी लढा; राजकीय, मनोरंजन अन् क्रीडा क्षेत्रातून मिळतोय सपोर्ट

दिल्ली : सध्या देशाची राजधानी दिल्लीत भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्याविरोधात देशातील कुस्तीपटू आंदोलन करतायत.

सरकार त्यांचं म्हणणं ऐकत नाही असं कुस्तीपटूंचं म्हणणं आहे. ब्रिजभूषण सिंग यांनी महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केले असून तक्रारी करूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असा त्यांचा आरोप आहे. आता शेतकरी नेते राकेश टिकैतही त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. याचबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही आज (28 एप्रिल) चालू असलेल्या कुस्तीपटूंच्या निषेधाचं पूर्ण समर्थन केलंय. ममता बॅनर्जींनी आवाहन केलंय की दोषींना त्यांच्या राजकीय पठिंब्याची पर्वा न करता कायद्याच्या कचाट्यात आणण्याची गरज आहे.

राकेश टिकैत यांनी खेळाडूंच्या समर्थनार्थ ट्वूट करत लिहिलंय, “ज्या कुस्तीपटूंनी देशासाठी पदक जिंकून देशाची मान अभिमानाने उंचावली आहे, त्यांच्यासोबत संपूर्ण देश उभा आहे. आजच्या युगात जो हसतो तो गरजेच्या वेळी इतरांना उपयोगी पडतो. जो न घाबरता सत्य बोलतो तो एक उत्तम पैलवानही असतो.”

दुसरीकडे ममत बॅनर्जी ट्वीट करत लिहितात की , “आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे राहिले पाहिजे. ते एका आवाजात सोबत न्यायासाठी बोलतायत. आमचे खेळाडू हे आपल्या देशाचे अभिमान आहेत. ते चॅम्पियन आहेत,” असं त्यांनी ट्वीट केलंय. “दोषींना त्यांच्या राजकीय संबंधांची पर्वा न करता कायद्याच्या कचाट्यात आणलंच पहिजे. न्यायाचा विजय झालाच पाहिजे. सत्याचा विजय झालाच पाहिजे,” असंदेखील ममता बॅनर्जींनी लिहिलंय.

संबंधित लेख

लोकप्रिय