Saturday, June 29, 2024
Homeजुन्नरJunnar : श्री शिव छत्रपती महाविद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

Junnar : श्री शिव छत्रपती महाविद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

Junnar (आनंद कांबळे) : श्री शिव छत्रपती महाविद्यालयात इ.११वीच्या शैक्षणिक वर्ष २०२४ – २०२५ कॉलेज जीवनाच्या प्रवेशाची सुरुवात करताना विद्यार्थ्यांचे आनंदी व उत्साहाच्या वातावरणात संस्थेचे अध्यक्ष प्रतिनिधी प्रा व्ही बी कुलकर्णी व प्राचार्य डॉ एम बी वाघमारे तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा पी एस लोढा, पर्यवेक्षक प्रा एस ए श्रीमंते व शिक्षकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. (Junnar)

कला, वाणिज्य व विज्ञान, एमसीव्हीसी या सर्व शाखेतील विद्यार्थांच्या हातून फीत कापून व विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देवून प्राध्यापक व प्राध्यापिकांनी अतिशय उत्साहात व आनंदाने स्वागत केले. आणि सर्व विद्यार्थ्यांचा कॉलेजचा पहिला दिवस संस्मरणीय केला. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला विभाग प्रमुख प्रा आर एस कांबळे व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. ए पी ढोले व विज्ञान विभाग प्रमुख प्रा. एस एम इंगळे तसेच एमसीव्हीसी विभाग प्रमुख प्रा.के जी नेटके आदी उपस्थित होते. 

सर्वांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देवून त्यांचे स्वागत केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. एम बी वाघमारे म्हणाले ‘कॉलेज जीवनात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबर सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रतिनीधी प्रा.व्ही.बी. कुलकर्णी यांनी संस्थेचे अध्यक्ष ॲड.संजय शिवाजीराव काळे तसेच संस्थेचे विश्वस्त यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस व उज्वल भविष्यासाठी व उत्तम करिअरसाठी शुभेच्छा दिल्या.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : देशात एँटी पेपर लीक कायदा लागू, मध्यरात्री अधिसूचना जारी, वाचा काय आहे कायदा !

NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती

MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती

ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती

युद्ध थांबवले पण पेपरफुटी थांबवता आली नाही… राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

मोठी बातमी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन

सर्वात मोठी बातमी : पोलिस भरती संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय