Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने राज्यातील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. सध्या काही भागांत थंडीचा अनुभव येत असताना, तर काही ठिकाणी दिवसाच्या तापमानात वाढ होत आहे. IMD (भारतीय हवामान विभाग) कडून मिळालेल्या माहितीनुसार, 15 नोव्हेंबरनंतर राज्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता असून, नोव्हेंबर अखेरीपर्यंत संपूर्ण राज्यभर तापमान घटणार आहे.
मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसह विविध जिल्ह्यांत थंडीचा अनुभव येत आहे. सांगली, नागपूर, जळगाव यांसारख्या भागांत सध्या रात्रीच्या तापमानात घट होत आहे, तर काही ठिकाणी सकाळी गार वारे आणि धुक्याची चादर दिसून येत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी शेकोट्यांचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या 24 तासांत नाशिकमध्ये राज्यातील नीचांकी तापमान नोंदवले गेले असून, पुण्यात 15.2°C, जळगाव 15.8°C, महाबळेश्वर 15.6°C, मालेगाव 17.8°C आणि नागपूरमध्ये 18.6°C सातारा 16.6°C, परभणी 18.3°C, सांगली 14.4°C, इतकं तापमान नोंदवण्यात आलं आहे. हवामान विभागाने आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांना थंडीपासून बचावासाठी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
वातावरणातील या बदलामुळे आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे राज्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
Weather Update
हेही वाचा :
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
अमित शाह यांचं शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान; समर्थ रामदासांचा उल्लेख करत गुलामीचा उल्लेख
महायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार? नरेंद्र मोदींची घोषणा
फॉर्म भरुनही पैसे आले नाही ; महत्वाची माहिती समोर
चार दिवसात सोयाबीनला अपेक्षित दर मिळेल ; भाजपच्या ‘या’ नेत्याची घोषणा
शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा
ईडीच्या दबावामुळे भाजपसोबत गेले ; छगन भुजबळ यांचा खळबळजनक दावा समोर
नरेंद्र मोदींची राज्यातील नऊ सभांची मोहीम सुरू; महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार
महाविकास आघाडीने जनतेला दिली पाच मोठी आश्वासने; जाणून घ्या सविस्तर
मुख्यमंत्री शिंदेंच्या दहा मोठ्या घोषणा; राज्यातील बहिणींना मिळणार 2100 रुपये दरमहा