Weather : उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. घसरलेल्या तापमानाचा जीवनमानावर परिणाम होत आहे. मंगळवारी नाशिकमध्ये 9.4 अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली, तर निफाडमध्ये 8.9 अंश सेल्सियस तापमान होते. जळगावमध्ये नीचांकी 8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
थंडीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी नाशिक महानगरपालिकेने शाळांच्या वेळेत बदल केला आहे. आता महापालिकेच्या शाळा सकाळी 7 ऐवजी 8 वाजता सुरू होतील, तर खासगी शाळा 8 ऐवजी 9 वाजता सुरू होतील. महापालिका शिक्षण विभागाने हा निर्णय जाहीर केला असून पालक वर्गाने याचे स्वागत केले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 10 ते 14 डिसेंबर दरम्यान थंडीची लाट राज्यात कायम राहणार आहे. उत्तर भारतातील थंड वारे महाराष्ट्राकडे वाहत असल्याने उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला आहे. मुंबईत देखील थंडी वाढली आहे.पुढील 5 दिवस हे राज्यात थंडीचे असणार आहेत, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
Weather
हे ही वाचा :
मोठी बातमी : कुर्ल्यात बेस्ट बसचा भीषण अपघात, 6 ठार, 49 जखमी ; धक्कादायक व्हिडिओ समोर
वडापाव विक्रेत्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास ; आमदार विनोद निकोले यांची प्रेरणादायक कहाणी
लाडकी बहीण योजनेतील अर्जांची छाननी होणार ? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती
महिलांना केंद्र सरकारकडून मिळणार 7 हजार रूपये, काय अट आहे वाचा !
पिंपरी चिंचवडमध्ये भंगार गोदामाला भीषण आग, रहिवासी भागात धुराचे लोट
Jio च्या ग्राहकांसाठी खूशखबर : 479 रुपयांत 84 दिवसांचा नवा प्लॅन ; वाचा काय आहे ऑफर
95 विधानसभा मतदारसंघात EVM-VVPAT मशिन्सच्या तपासणीसाठी 104 अर्ज प्राप्त
नेक्स्ट जेनरेशन बजाज चेतक या महिन्यात लाँच होणार, वाचा काय असणार किंमत
जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत मोठी भरती