मुंबई : भारतात अनेक लोक क्रिकेट खेळाचे प्रचंड शौकीन आहेत, क्रिकेटचा कोणताही सामना असो अनेक लोक आवडीने पाहत असतात. नुकतेच टाटा आयपीएलचे सामने सुरू झाले असून आयपीएलचे चाहते मोफत क्रिकेट कसे पहावे याचा शोध घेत आहेत.
आयपीएलचे सामने २६ मार्चपासून Disney + Hotstar वर लाईव्ह करण्यात आले आहे. या अगोदरच जिओ, एअरटेल आणि वोडाफोनने क्रिकेट प्रेमींसाठी काही प्लॅन आणले आहेत. या प्लॅनमध्ये Disney प्लस Hotstar च्या सबस्क्रिप्शनसोबतच तुम्हाला अमर्यादित डेटा, मोफत कॉलिंग, एसएमएस आणि इतर सुविधाही दिल्या जात आहेत. त्यामुळे आपल्या मोबाईल रिचार्जवर आयपीएलचा देखील आनंद घेता येणार आहे.
एअरटेल
एअरटेल Disney प्लस Hotstar सदस्यत्वासाठी 499 रुपयांचा 28 दिवसांसाठी रिचार्ज प्लॅन ऑफर करते. Disney प्लस Hotstar सदस्यत्व असलेल्या मोबाईल वापरकर्त्यांसाठी ही सर्वात स्वस्त रिचार्ज योजना आहे. यामध्ये दररोज 2GB डेटा, 100SMS, अनलिमिटेड कॉलिंग दिले जात आहे. यासोबतच Airtel Amazon Prime Video ची 30 दिवसांसाठी मोफत चाचणी देत आहे.
जिओ
Disney + Hotstar साठी जिओचा देखील 499 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आहे. त्यामध्ये वापरकर्त्यांना 28 दिवसांसाठी दररोज 2GB अमर्यादित डेटा, मोफत कॉलिंग, दररोज 100SMS दिला जाईल. तसेच, 56 दिवसांसाठी 799 रुपयांचे, 84 दिवसांसाठी 1066 रुपयांचे आणि 365 दिवसांसाठी 3119 रुपयांचे प्लॅन आहेत. यासोबतच Jio TV, Jio Cinema आणि Jio Mart च्या वस्तूंवर 20 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. त्याच वेळी, Jio Fiber वापरकर्ते 279 रुपयांच्या रिचार्जवर IPL चा आनंद घेऊ शकतील.
व्होडाफोन-आयडीया Vi
Vodafone Idea ने देखील 499 रुपयांचा रिचार्ज प्लॅन जाहीर केला आहे. 499 रुपयांच्या रिचार्जवर, तुम्हाला Disney + Hotstar सदस्यता, अमर्यादित कॉलिंग, मोफत 100 SMS आणि 2GB डेटा दररोज 28 दिवसांसाठी मिळेल.