महिला दिनाचा इतिहास प्रेरणा देणारा आहे : स्मिता जाधव
पिंपरी चिंचवड : वाकड येथील ऊर्जा अकडेमी येथे अभिसार फाउंडेशन आणि वुई टूगेदर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त मेळावा आयोजित करण्यात आला होता. जगात सर्व देशात 8 मार्च महिला दिवस साजरा करण्यात येतो, आज कार्पोरेट,केंद्रीय प्रशासन, विमानसेवा, रेल्वे, पोलीस, बँकिंग, आय टी ई सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत.हे बदल गेल्या 200 वर्षातील महिलाच्या लढयामुळे झाले आहेत, हा इतिहास समजून घेतला पाहिजे, असे स्मिता जाधव समुपदेशक वुई टूगेदर फाउंडेशन, पिंपरी चिंचवड यांनी मेळाव्यात मार्गदर्शन करताना सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, मात्र एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत, स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असे. उपभोग व कष्ट याचे साधन म्हणजे स्त्री, असा समज सर्वसाधारणपणे रूढ होता. समाजात समानतेने वावरणे, संपत्तीवरील अधिकार, तसेच शिक्षण किंवा मतदान यासारख्या अधिकारांपासून स्त्रिया वंचित होत्या. पुरुष कामगारा इतकेच समान वेतन आम्हाला मिळाले पाहिजे, कामाचे तास आठ असावेत, अशा विविध मागण्यांसाठी अमेरिका,युरोप मध्ये महिला निदर्शने करत होत्या. स्त्रियांना नोकरी करता यावी, विद्यापीठांमधे प्रवेश मिळावा म्हणून मरियन हाईनिश या ऑस्ट्रियन महिलेने प्रथम लढा उभारला. तर, केट शेफर्ड यांनी स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून न्यूझिलंडच्या सुफ्राजेट कार्यकर्तीच्या मार्गदर्शनाखाली लढा उभारला. त्यांनतर एका आंतरराष्ट्रीय महिला संमेलनामध्ये 8 मार्च 1911 रोजी जगातील सर्व महिलांना एकजुटीने एकत्र करण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिवस जाहीर करण्यात आला.
DYFI पुणे जिल्हाध्यक्ष पदी डॉ. आशिष मेरूकर तर जिल्हा सचिवपदी सचिन देसाई यांची निवड !
राजा राम मोहन रॉय, महर्षी कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले आमचे युगपुरुष : सोनाली मन्हास
वुई टूगेदर फाउंडेशनच्या सोनाली मन्हास म्हणाल्या, भारतामध्ये स्त्रियांचे गुलामीचे जीवन पाहून तिलाही चांगले जगण्याचे अधिकार असले पाहिजेत, कुटुंबव्यवस्थेमध्ये स्त्री सन्मान मिळाला पाहिजे. सतीप्रथा, केशवपन, बालविवाह या कुप्रथापासून तिची मुक्ती व्हावी यासाठी राजा राम मोहन रॉय, महर्षी कर्वे, महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले, ईश्वरचंद विद्यासागर, रमाबाई रानडे यांनी केलेले कार्य अमूल्य आहे. ही माणसं आमच्यासाठी युगपुरुष आहेत. असे सोनाली मन्हास यांनी प्रतिपादन केले.
पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांवर अट्रोसिटी दाखल करा – बाबा कांबळे
मुलगी शिकली तर दोन्ही घरे उजळतात,संस्कृती समृद्ध करतात : कल्पना मोहिते
अभिसार फाउंडेशनच्या कल्पना मोहिते म्हणाल्या, आजही मुलींना शिक्षण देताना दुजाभाव केला जातो. मुलगी शिकली तर दोन्ही घरे उजळतात,संस्कृती समृद्ध करतात. शिकलेल्या मुली कठीण प्रसंगावर मात करतात. समाजात कौटुंबिक आघात सोसणाऱ्या महिलांचे आर्थिक आणि सामाजिक सबलीकरण करण्यासाठी संस्थात्मक, रचनात्मक काम वाढवले पाहिजे.
कमावत्या आणि आर्थिक संपन्न महिलांनी एकत्र येऊन विकलांग, विधवा, निराधार महिलांना मदतीचा हात दिला पाहिजे. ग्रामीण दुर्गम भागातील महिलांचे पोषण करण्यासाठी शहरातून आहार गोळा करून त्यांचे आरोग्य वर्धन करू, असे कल्पना मोहिते यांनी सांगितले.
भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या एकूण ३५४ जागा, आजच अर्ज करा!
या मेळाव्याचे प्रास्ताविक रमेश मुसडगे यांनी केले. सूत्रसंचालन उमा जगताप यांनी केले. प्राची पुराणिक, वैष्णवी जगताप, अभिजित तांबे, प्राची मॅडम यांनी मेळाव्याचे संयोजन केले.
– क्रांतिकुमार कडुलकर