Saturday, June 29, 2024
Homeराजकारणराज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान सुरू, मविआ आणि भाजपमध्ये चूरस

राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान सुरू, मविआ आणि भाजपमध्ये चूरस

मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (शुक्रवार) मतदान होत आहे. या निवडणूकीसाठी सात उमेदवार रिंगणात असून या निकालावर महाराष्ट्रातील मोठी सत्तासमीरणं अवलंबून आहे. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस पहायला मिळत आहे. अपक्षांनी आपल्याला मतदान करावे यासाठी मविआ आणि भाजपकडून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. 

या निवडणुकीत महाविकास आघाडीने चार उमेदवार उभे केले आहे, त्यात शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार हे दोन उमेदवार आहेत, तर राष्ट्रवादीकडून प्रफूल्ल पटेल आणि काँग्रेसकडून इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये रस्सीखेच पहायला मिळत आहे. या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना यांच्यात सहाव्या जागेसाठी चुरस पाहायला मिळत आहे. सहाव्या जागेवर कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांना पहिलं मतदान करण्याचा मान मिळाला आहे. तर राज्यसभा निवडणुकीत नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना न्यायालयाने मतदानाला परवानगी नाकारल्याने सत्ताधारी महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे आघाडीच्या दोन मतांचे गणित बिघडले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 64 पदांसाठी भरती, 25000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी

पुणे येथे 10 वी आणि 12 वी पास करू शकता अर्ज, BRO मध्ये 876 जागांसाठी भरती

ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 20000 ते 25000 पगाराची नोकरी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय