पुणे / दिपाली पवळे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालय आणि निवडणूक आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने निवडणूक साक्षरता क्लब अंतर्गत दि. 02 एप्रिल 2024 रोजी, पिरंगुट ता. मुळशी येथे महाविद्यालयाच्या वतीने ‘मतदार जनजागृती रॅली’चे आयोजन करण्यात आले. Voter Awareness Rally on behalf of Anantrao Pawar College
मतदान हा आपला हक्क असून प्रत्येकाने तो बजावला पाहिजे. याविषयी प्रचार, प्रसार आणि मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने सदर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पिरंगुट पंचक्रोशीतील बाजारपेठेच्या मार्गातून सदर रॅली काढण्यात आली.
रॅलीमध्ये मुळशीच्या तहसीलदार प्रियांका मिसाळ, नोडल ऑफिसर ठाकूरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे, महाविद्यालयातील नोडल अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, ग्रामस्थ आणि व्यावसायिक मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी मतदानाचा हक्क बजावण्याविषयी पिरंगुट कॅम्प येथे मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.
तहसीलदार प्रियांका मिसाळ, नोडल ऑफिसर ठाकूरेसाहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांनी यावेळी उपस्थितांना मतदान प्रक्रिया आणि मतदानाच्या हक्काविषयी मार्गदर्शन केले. देशाच्या विकासासाठी तरुणांचे असणारे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचेही प्रतिपादन करताना तरुणांची शक्ती महत्त्वपूर्ण असल्याची मत मांडले. त्याचबरोबर सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन केले.
तहसीलदार प्रियांका मिसाळ यांनी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या या मतदार जनजागृती रॅलीच्या स्तुत्य उपक्रमाविषयी कौतुक करून नवमतदारांना मतदान करण्याबरोबरच आपल्या परिवाराला, आपल्या आप्तेष्टांनाही आपण या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्याविषयी आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांनी मतदान करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे असे सांगताना मतदान करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन सर्वांना सोबत घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी मतदान करण्याविषयीच्या गीताचे सादरीकरण करण्यात आले. तसेच मतदानाची शपथ घेण्यात आली.
मतदार जनजागृती करण्याविषयी विद्यार्थ्यांनी ‘मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो!’ ,’सोडा सर्व काम चला करू मतदान’, जागरूक नागरिक होऊया अभिमानाने मत देऊया’ या विविध घोषणा दिल्या. या रॅलीमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी, पिरंगुट गावातील ग्रामस्थ, व्यावसायिक, महाविद्यालयातील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


NHSRC : राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्र अंतर्गत भरती
IIT : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अंतर्गत भरती
Mahavitaran : महावितरण अंतर्गत 800 जागांसाठी भरती
ECIL : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती
SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती