Sonepat: पोलीस अनेकदा अमली पदार्थांविरोधात कारवाई केल्याचा दावा करतात, पण काहीवेळा त्यांचे दावे फोल ठरतात. अशीच एक घटना हरियणाच्या (Haryana) सोनीपतमधून समोर आली आहे. येथे अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमादरम्यान विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने सर्वांसमोर पोलिसांची पोलखोल केली. (Haryana) विद्यार्थ्याने थेट डीसीपींना आरसा दाखवला. Cannabis is available in front of the checkpoint
चार विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले. गुरुवारी पोलिसांनी सोनीपतच्या राय एज्युकेशन सिटीमध्ये असलेल्या अशोका युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात जागरुक करण्यासाठी एका सेमिनारचे आयोजन केले होते. यामध्ये डॉ. बी.आर. आंबेडकर लॉ युनिव्हर्सिटी, अशोका युनिव्हर्सिटी, एसआरएम युनिव्हर्सिटी आणि ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी, या चार प्रसिद्ध विद्यापीठांमधून विद्यार्थी आले होते. या सेमिनारला डीसीपी सतीश कुमार आणि इतर पोलीस अधिकारीदेखील उपस्थित होते. पोलिसांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती देऊन त्याचे सेवन न करण्याचे आवाहन केले. यावेळी एक विद्यार्थी उभा राहिला आणि त्याने थेट पोलिसांना गोत्यात आणले.
काय म्हणाला तो विद्यार्थी?
पोलिसांसमोर विद्यार्थ्याने सांगितले की, ‘इथे अनेक मुले ड्रग्ज विक्री करणाऱ्याला शोधतात आणि त्यांच्याकडून ड्रग्स घेतात. मुलांना ड्रग्सवाले सापडतात, मग पोलिसांना हे सर्व का दिसत नाही? आमच्या विद्यापीठासमोर पोलिस चौकी असून खुलेआम गांजाची विक्री केली जाते. गांजा किंवा इतर मादक पदार्थ मिळवणे चॉकलेट मिळवण्यासारखे सोपे आहे. हे पोलिसांचे अपयश आहे, असे तुम्हाला वाटत नाही का?’ विद्यार्थ्याचे बोलणे ऐकून उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून त्याला समर्तन दर्शवले. पोलिसांची पोलखोल करणाऱ्या या विद्यार्थ्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ‘Ganja is obtained in front of the checkpoint’, the student showed the mirror to the police in front of everyone, netizens praised
पण या व्हिडीओत विद्यार्थ्याच्या प्रश्नाचाच फक्त भाग ठेवण्यात आला आहे. पण, विद्यार्थ्याच्या प्रश्नावर पोलीस अधिकारी नेमके काय उत्तर देतात हे या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत नाही. विद्यार्थ्याच्या प्रश्नाचा हा व्हिडीओ @divya_gandotra नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे, सोनिपतच्या ‘डॉ. बी. आर. आंबेडकर राष्ट्रीय कायदा विद्यापीठामधील एका विद्यार्थ्याने एका मुद्द्याकडे लक्ष केंद्रित करीत पोलिसांना प्रश्न विचारण्याचे धैर्य दाखवले; ज्यावर पोलीस चर्चा करण्याचे टाळत होते. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले- तो खूप धाडसी विद्यार्थी आहे. आपल्याला त्याच्यासारख्या मुलांची गरज आहे. या देशाचे भविष्य उज्ज्वल आहे. दुसऱ्या युजरने लिहिले- विद्यार्थ्याला सलाम. तिसऱ्या युजरने लिहिले- अगदी बरोबर बोललास.
![whatsapp link](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/whatsapp.gif)
हे ही वाचा :
पुण्यात एका अफवेने मध्यरात्री तणावाचे वातावरण, पोलिसांचा चोख बंदोबस्त
ब्रेकिंग : सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांची घोषणा
ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार भाजपात जाणार का? रोहित पवारांची पोस्ट चर्चेत
ब्रेकिंग : रोहित पवार यांच्यावर ईडीची मोठी कारवाई; शरद पवार गटाला झटका
मोठी बातमी : मराठा आरक्षणा संदर्भात राज्य सरकारला न्यायालयाचे महत्वाचे निर्देश
हो मला आदित्यला मुख्यमंत्री करायचंय… उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान