Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्याखळबळजनक : दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे...

खळबळजनक : दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे उमेदवार अडचणीत

Vidhansabha election : राज्यात विधानसभा निवडणूक जवळ येत असताना सांगलीच्या तासगाव भागातून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी दिवाळीच्या फराळाच्या पाकिटातून मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी हा आरोप केला असून, याप्रकरणी भरारी पथकाने कारवाई केली आहे.

या संदर्भात भरारी पथकाने तातडीने कारवाई केली असून, रोहित पाटील यांचे समर्थक सचिन उर्फ बाबजी गणपतराव पाटील आणि बाबासाहेब उर्फ खंडू निवृत्ती कदम यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भरारी पथकाने तासगाव येथील साठेनगर भागात सचिन पाटील यांच्याकडे सापडलेले पांढऱ्या रंगाची 16 पाकिटे आणि त्यात प्रत्येकी तीन हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. एकूण 1 लाख 8 हजार 500 रुपयांसह फराळाच्या पाकिटांमध्ये मतदारांना पैसे देण्याचा प्रकार उघड झाला आहे.

दरम्यान, पैसे वाटणाऱ्या दोघांना पोलीस स्टेशन येथे आणल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले होते. दुसरीकडे, अजित पवार गटाचे उमेदवार संजयकाका पाटील यांनीही पोलिस ठाण्यात येऊन या प्रकरणावर चर्चा केली.चौकशीदरम्यान, सचिन पाटील यांना छातीत दुखण्याचा त्रास झाल्याने त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.

या घटनेने सांगलीत राजकीय वातावरण तापले असून, आचारसंहितेच्या भंगामुळे शरद पवार गटासाठी ही एक मोठी अडचण निर्माण झाली आहे.

Vidhansabha election

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार

कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी

आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी

ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

संबंधित लेख

लोकप्रिय