कोची / पी. व्ही. थॉमस : केरळ, लक्षद्वीप, किनारपट्टीचा भाग, दक्षिण कर्नाटक, उत्तर कर्नाटक, तामिळनाडू आणि मध्य प्रदेशमध्ये पुढील पाच दिवसांत जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
आज सकाळी 6 च्या दरम्यान केरळच्या कोची शहरात पावसाला सुरुवात झाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा मान्सूनच्या प्रभावावर परिणाम करणारा असला तरी 9 जून पासून केरळच्या किनारपट्टी भागात अंदमान निकोबार मधून पावसाची सुरवात होण्याचा अंदाज आहे. कोची शहरात पाऊस सुरू झाल्यामुळे परिसरात थंडावा निर्माण झाला आहे, त्यामुळे नागरिकांना दिलासाव मिळाला आहे.
11 जून पर्यंत केरळमध्ये पाऊस पडेल. तामिळनाडूमध्ये 7 जून, लक्षद्वीपमध्ये 9 ते 11 जून दरम्यान पाऊस होऊ शकतो. कर्नाटकमध्ये 10 आणि 11 जूनला मान्सून पूर्णपणे दक्षिण भारतात सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. आज कोची मध्ये पावसाने सुरूवात केली असली तरी कोझिकोडे, एर्नाकुलम सह केरळच्या इतर भागात मोसमी ढग अद्यापही दिसत नाहीत.