Monday, December 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडजेष्ठ अभिनेते रविंद्र बेर्डे यांचे निधन

जेष्ठ अभिनेते रविंद्र बेर्डे यांचे निधन

मुंबई:दि.13-ज्येष्ठ मराठी अभिनेते रविंद्र बेर्डे यांचे 78 व्या वर्षी मुंबईत निधन झाले.गेल्या काही काळापासून घशाच्या कर्करोगाने आजारी होते.

ते टाटा रुग्णालयात उपचार देखील घेत होते.रविंद्र बेर्डे हे लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे भाऊ होते. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.दोन दिवसांपूर्वीचं त्यांना रुग्णालयायातून घरी सोडण्यात आले होते.मात्र, घरी आल्यानंतर त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.वयाच्या विसाव्या वर्षी आकाशवाणी आणि 1965 च्या काळात नाट्यसृष्टी मध्ये अभिनयास सुरवात केली.

चंगू मंगू,एक गाडी बाकी अनाडी,हाच सुनबाईचा भाऊ,खतरनाक,हमाल दे धमाल,थरथराट,उचला रे उचला यांसारख्या 300 हून अधिक मराठी चित्रपट आणि जवळपास पाच हिंदी चित्रपटातून त्यांनी काम केलं आहे. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीही त्यांनी गाजवली आहे.
गेल्या दहा ते 12 वर्षांपासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती.रवींद्र बेर्डे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय