Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Vasant more: वसंत मोरे यांना निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्ह बहाल

Vasant more : पुणे लोकसभा मतदारसंघात प्रचाराचे वातावरण चांगलेच तापले आहे. पुणे लोकसभा मतदार संघात सात जणांनी माघार घेतल्याने आता एकुण ३५ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहे. त्यामध्ये भाजपकडून मुरलीधर मोहोळ काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर मैदानात आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे (Vasant more) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

---Advertisement---

पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. काही दिवसांपुर्वीच वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला होता. आता निवडणूक आयोगाकडून वसंत मोरे यांना निवडणूक लढवण्यासाठी चिन्ह बहाल केलं आहे. पुणे लोकसभेसाठी निवडणूक आयोगाकडून वसंत मोरे (Vasant more) यांना ‘रोड रोलर’ हे चिन्ह देण्यात आले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर एक्सवर पोस्ट करत निवडणूक आयोगाने ‘रोडरोलर’ हे चिन्ह दिल्याची माहिती दिली. तसेच ‘पुण्यात आता वसंत (तात्या) मोरे यांचा विकासाचा रोडरोलर प्रस्थापितांची झोप उडवणार’ असेही म्हटले आहे.

---Advertisement---

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यंदा आम्ही लोकसभेत खाते नक्की उघडू, असा विश्वास व्यक्त केला आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

SC, ST, OBC आरक्षण संपुष्टात आणणार अमित शहांचा व्हिडिओ व्हायरल, वाचा काय आहे सत्यता !

दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात होणार बदल, वाचा काय असेल बदल !

मोठी बातमी : दहावी बारावीचा निकाल “या” दिवशी लागणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात सभा

धक्कादायक ! बहिणीच्या हळदीला नाचताना तरुणीला हार्ट ॲटक, जागीच मृत्यू

महाराष्ट्रातील जनता परिवर्तन करण्याच्या मनस्थितीत – शरद पवार

धक्कादायक : प्रसिद्ध अभिनेत्रीची व्हॉट्सॲप स्टेट्स ठेवत आत्महत्या

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles