पिंपरी चिंचवड, (1 जून) : पुणे आळंदी रोड येथे रिक्षा टेम्पो व छोट्या बांधवांसाठी पासिंग ट्रॅकचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. या कार्यक्रमस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार नियोजित वेळेआधीच पोहोचल्याने सर्वांचा एकच गोंधळ उडाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे तसेच इतरही मान्यवर येणे बाकी होते.
कार्यक्रमासाठी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव हे देखील लवकरच आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी बाबा आढाव यांच्या तब्येतीची विचारपूस करत अनेक विषयावरती चर्चा केली. तसेच, रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करणे, मुक्त रिक्षा परवाना बंद करणे, इतर विविध प्रश्नांवर यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चर्चा केली. यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी विविध मागण्यांचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.
या चर्चेमुळे रिक्षाचालक मालकांचे कल्याणकारी महामंडळ मुक्त रिक्षा परवानासह अनेक प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा असल्याचे बाबा कांबळे यांनी व्यक्त केली.
संपादन – क्रांतिकुमार कडुलकर