पुणे, 31 मे : उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा MHT CET परीक्षेसंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. पुढच्या वर्षीपासून प्रवेश प्रक्रिया राबवताना सीइटीचे 50 टक्के आणि 12 वीचे 50 टक्के गुण गृहित धरले जाणार आहेत.
CET प्रवेशासाठी राज्य शिक्षण मंडळातर्फे काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. सीइटीचे 50 टक्के आणि 12 वीचे 50 टक्के गुण गृहित धरले जाणार आहेत. CET चा पेपर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. हा अभ्यासक्रम 80 टक्के इयत्ता 12 वी वर तर उर्वरित महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 11वी वर आधारित असणार आहे. CET द्वारे होणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवेशांना हा निर्णय लागू होणार आहे. हि नियमावली पुढच्या वर्षीपासून लागू होणार आहे, अशी माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
पुढच्या वर्षीपासून सीइटीचा निकाल 1 जुलै लागेल आणि 1 सप्टेंबर पासून सत्र सुरू होईल. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना मिळालेले गुण कमी वाटतील अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घेण्याची देखील घोषणा उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
रयत शिक्षण संस्था, सातारा येथे 107 जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 2 जून 2022 रोजी मुलाखत
भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान पुणे येथे 35 पदांसाठी भरती, आजच करा अर्ज
मेगा भरती : भारतीय पश्चिम रेल्वेत 3612 पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी !