मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडुन घेण्यात आलेल्या बारावी परिक्षेचा निकाल आज जाहिर झाला आहे. अनेक दिवसांपासून विद्यार्थी आणि पालक या निकालाची आतुरतेने वाट पहात होते. दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.
कोकण विभागाने पहिला क्रमांक पटकावला असून कोकण – 97.22 टक्के, मुंबई – 90.91 टक्के, अमरावती – 96.34 टक्के, नागपूर – 96.52 टक्के, पुणे – 93.61 टक्के, कोल्हापूर – 95.07 टक्के, नाशिक – 95.03 टक्के, औरंगाबाद – 94.97 टक्के, लातूर – 95. 25 टक्के असा निकाल आहे.
आज दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर हे सर्व निकाल ऑनलाईन पद्धतीनं जाहीर झाले आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचं नाव टाकुन ऑनलाईन निकाल बघता येणार आहे.
सीमा रस्ते संघटन (BRO) मध्ये 876 जागांसाठी भरती, पुणे येथे 10 वी, 12 वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज !
या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल
hscresult.11thadmission.org.in
या वर्षीच्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या होत्या.
सरकारी नोकरी : इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल सिलेक्शन अंतर्गत 8106+ जागांसाठी बंपर भरती, आजच करा अर्ज
नवीन भरती : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख