Thursday, September 19, 2024
HomeNewsआळंदी सिध्दबेटात ट्री मॅन ऑफ इंडिया विष्णू लांबा, निसर्ग संवर्धन कार्याची पाहणी

आळंदी सिध्दबेटात ट्री मॅन ऑफ इंडिया विष्णू लांबा, निसर्ग संवर्धन कार्याची पाहणी

आळंदी : येथील आळंदी नगरपरिषदेच्या विशेष सहकार्याने आळंदीतील सिद्धबेट मध्ये वृक्षारोपण,संवर्धन तसेच पर्यावरण रक्षणाचे कार्य हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत आरंभ फाउंडेशन, सहयोगी संस्था, आळंदी जनहित फाउंडेशन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच यांनी आळंदी सिध्दबेटात पंचवटी उद्यान वृक्षारोपण करीत विकसित करण्याचे कार्य सुरु केले आहे. या कामाची स्थळ भेट देत पाहणी करून ट्री मॅन ऑफ इंडिया विष्णू लांबा यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

या प्रसंगी आरंभ फाउंडेशन अध्यक्षा वैष्णवी पाटील, विनायक पाटील, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच प्रमुख सुरेश देसाई, योगेश वाघ, श्रीराज कताडे आदी उपस्थित होते. या पंचवटी उद्यानात ८३ प्रजातीची २०० झाडे पहिल्या टप्यात लावण्यात आली आहे. या सिध्दबेटातील पंचवटी उद्यानास भेट देण्यासाठी महाराष्ट्र वन विभागाचे ग्रीन आर्मीचे ब्रँड अँबेसिडर ट्री मॅन ऑफ इंडिया विष्णु लांबा यांनी भेट देत सुरु असलेल्या कार्याचे कौतुक केले. यावेळी येथील अजान वृक्ष बागची माहिती जाणून घेतली. संस्थेच्या अध्यक्षा वैष्णवी पाटील यांनी दुर्मिळ झाडे लावण्याचा उद्देश सांगत असताना म्हणाल्या. माऊलीं पदस्पर्शाने पावन झालेल्या संत लीलाभूमीत असलेल्या तीर्थक्षेत्री दुर्मिळ झाडांच्या संवर्धनासाठी काम सुरु असल्याचे सांगितले.

सिद्धबेटची स्वच्छता, सुशोभीकरण आणि वारकऱ्यांना एक प्रसन्न वातावरण निर्माण करण्यासाठी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव तसेच विविध सेवाभावी संस्थाचे सेवा कार्य या ठिकाणी रुजू होत आहे. यावेळी विष्णू लांबां यांनी कार्यवाही माहिती घेत खूप कौतुक केले. धार्मिक तीर्थक्षेत्रे अशा गोष्टीचे कार्य होणं, नैसर्गिक वातावरण निर्माण करणे, तसेच हजारोंच्यावर पशु,पक्षी, झाडे नामशेष होत चाललेली असून, झाडांसाठी येथे जो प्रकल्प राबविला जात आहे. त्या सर्वांचे यावेळी त्यांनी कौतुक केले. पंचवटी उद्यानात ट्री मॅन ऑफ इंडिया विष्णू लांबा यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सुरेश देसाई यांनी लांबा यांना ग्रामगीता भेट दिली. आरंभ फाउंडेशन सहयोगी संस्थेचे विनायक पाटील,सुरेश देसाई, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, योगेश वाघ, श्रीराज कताडे यावेळी उपस्थित होते.

तत्पूर्वी विष्णू लांबा यांनी आळंदी मंदिरात माऊलींचे संजीवन समाधी दर्शन घेतले. येथील प्रकारची माहिती घेत अजानवृक्ष बाग पाहणी करीत माहिती जननु घेतली. आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यांचे हस्ते नारळ प्रसाद देण्यात आला. येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदी चे दर्शन घेत नदी घाटावर तीर्थक्षेत्र पवित्र असू अधिक पावित्र्य जोपासण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. आळंदी सिध्दबेटात विविध सेवाभावी संस्थाचे माध्यमातून सुमारे सहाशेवर वृक्ष लावण्यात आले आहेत. यासाठी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी विशेष सहकार्य केले असल्याचे वृक्ष मित्र अर्जुन मेदनकर यांनी सांगितले.

विष्णू लांबा यांनी आरंभ फाउंडेशनच्या अध्यक्षा वैष्णवी पाटील यांच्या घरातील रोपवाटिका, सीड बँक, प्लास्टिक संकलन केंद्राची पाहणी केली. पाहणी करत ते म्हणाले, शहरात कमी जागेत हा उपक्रम राबविला आहे. यातून मोठे पर्यावरण संवर्धनाचे मोठे कार्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Lic
जाहिरात
संबंधित लेख

लोकप्रिय