Sunday, June 30, 2024
Homeताज्या बातम्याThane : गर्भवती महिलेला चादरीच्या झोळीतून नेण्याची वेळ; मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील घटना

Thane : गर्भवती महिलेला चादरीच्या झोळीतून नेण्याची वेळ; मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील घटना

Thane : मुरबाड तालुक्यातील धसई ओजीवले या कातकरी वाडीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी बांबूच्या झोळीतून नेण्याची वेळ आली आहे. या घटनेमुळं मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच प्राथमिक सुविधांचा अभाव असल्याचं दिसून आलं आहे.

चित्रा जाधव ही महिला माहेरी प्रसूती साठी ओजीवली या कातकरी वाडीत आली होती. प्रसूती वेदना सुरू झाल्याने तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यासाठी रुग्णवाहिका आली. मात्र कातकरी पाड्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने तिला काही अंतरापर्यत बांबूची डोली करून रुग्णवाहिकेपर्यत नेण्यात आले, त्या नंतर तिची प्राथमिक आरोग्य केंद्रात सुखरूप प्रसूती झाली. मात्र या घटनेवरून अजूनही आदिवासींपर्यंत विकास पोहोचला नाही हे दिसून येत आहे. (Thane)

दरम्यान, शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनीही हा व्हिडिओ ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी व्हिडिओ ट्विट करत म्हटलं आहे की, सामान्यांचं सरकार अशी जाहीरातबाजी करणाऱ्या या सरकारच्या अब्रुची लक्तरं वेशीवर टांगणारा हा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील आहे. हा व्हिडिओ ज्या मुरबाडमधील आहे तिथले आमदार भाजपाचे असून तिथले भाजपचे खासदार गेली पाच वर्षे केंद्रात मंत्री होते. हे सरकारमध्ये रस्त्यांमध्ये तर दोन हातांनी कमिशन खाल्लं जातंच पण मुख्यमंत्र्यांच्या ज्या विश्वासू मंत्र्याने ॲम्बुलन्स खरेदीत खेकड्याप्रमाणे कोट्यवधी रुपयांची दलाली खाल्ली त्या मंत्र्याला खुद्द मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात साधी ॲम्बुलन्सही देता येऊ नये? त्यामुळंच प्रसूतीकळा आलेल्या गर्भवती महिलेला असं झोळीतून न्यावं लागलं. मुख्यमंत्री महोदय सामान्य आदिवासी महिला भगिनींच्या वेदना या सरकारला कळणारच नाही का? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.

अजूनही राज्यातील अनेक आदिवासी वाड्या-वस्त्यांपर्यंत रस्ते पोहोचले नाही. सरकारे येता आणि जातात पर्यंत आजही आदिवासी समाजाची परवड थांबलेली नाही.

Thane

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

बेकायदेशीर पब-बार, अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर मोठी कारवाई

अहमदनगर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत लिपिक पदाची मोठी भरती

मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

विरोधी पक्षनेते राहुल गांधींना मिळणार अनेक अधिकार, मोदी सरकारची होणार अडचण !

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

१ हजार ९१० आशा सेविकांचे मोबाईल सुविधेतून सक्षमीकरण

भारतीय हवाई दल अंतर्गत मोठी भरती

अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मोठी बातमी : 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय