Monday, December 23, 2024
Homeराष्ट्रीयपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी, 20 किलो RDX ने मोदींवर...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी, 20 किलो RDX ने मोदींवर हल्ला करणार !

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. NIA च्या मुंबई ब्रांच ला हा धमकीचा मेल आला आहे. 20 किलो RDX ने मोदींवर हल्ला करणार असल्याचे मेल मध्ये म्हंटलं आहे. सदर मेल करणाऱ्याचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याची माहिती समोर येत आहे.

गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्लीपर सेलच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना २० किलो आरडीएक्सने मारण्याचा कट रचला जात होता.  राष्ट्रीय तपास संस्थेने गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांना धमकीचे ई-मेल पाठवले आहेत. सध्या देशातील तपास यंत्रणांकडून या ई-मेलसंदर्भात तपास सुरु आहे. मात्र, ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने आपले नाव उघड केलेले नाही. 

श्रीलंकेत महागाईचा हाहाकार ; नागरिकांची हिंसक आंदोलने, 45 जणांना पोलिसांनी केले अटक

…याची चौकशी केली जाईल – दिलीप वळसे-पाटील

पंतप्रधानांना धमकी आल्यानंतर देशभरातून याचा निषेध केला जात आहे. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी देखील याची चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे.

वळसे-पाटील म्हणाले, “देशाच्या पंतप्रधानांना कोणी धमकी देत ​​असेल तर ते योग्य नाही. हे पत्र महाराष्ट्राचे आहे का याची चौकशी केली जाईल. सत्य समोर येईल.”

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार, डॉ. डी. एल. कराड यांनी केले स्वागत

महाराष्ट्र जल संसाधन नियामक प्राधिकरण अंतर्गत भरती


संबंधित लेख

लोकप्रिय