मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याला पुन्हा एकदा गंभीर स्वरूपाची जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. 13 एप्रिल 2025 रोजी पहाटे 6:30 वाजता मुंबईच्या वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाइनवर एक धमकीचा संदेश आला, ज्यामध्ये सलमानच्या बांद्रा येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये घुसून त्याला मारण्याची आणि त्याची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांच्या वरळी येथील परिवहन विभागाच्या अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांकावर रविवारी पहाटे आलेल्या संदेशात अज्ञात व्यक्तीने सलमान खान याला थेट धमकी दिली. संदेशात म्हटले आहे, “मी सलमान खानच्या घरात घुसून त्याला मारेन आणि त्याच्या गाडीत बॉम्ब ठेवून ती उडवेन.” हा संदेश पाहिल्यानंतर वाहतूक पोलिसांनी तातडीने वरळी पोलिसांना कळवले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (हेही वाचा – महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याला एका झाडाने रात्रीतून केले करोडपती)
धमक्यांचे लॉरेन्स बिश्नोई कनेक्शन | Salman Khan
सलमान खानला यापूर्वीही अनेकदा धमक्या मिळाल्या आहेत, ज्यांचा संबंध प्रामुख्याने लॉरेन्स बिश्नोई टोळीशी जोडला जातो. 1998 मधील काळवीट शिकार प्रकरणामुळे बिश्नोई समाजाने सलमानविरुद्ध आक्षेप घेतला, काळवीट हा त्यांच्यासाठी पवित्र प्राणी आहे. गेल्या वर्षी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता, या घटनेनंतर सलमानची सुरक्षा वाय+ श्रेणीपर्यंत वाढवण्यात आली, आणि त्याच्या निवासस्थानाभोवती बुलेटप्रूफ काच, हाय-रिझोल्यूशन सीसीटीव्ही आणि चेहरा ओळखणारी यंत्रणा बसवण्यात आली. (हेही वाचा – धक्कादायक : दोन मित्रांची एकाच झाडाच्या फांदीला गळफास घेत आत्महत्या)
याशिवाय, नोव्हेंबर 2024 मध्ये सलमान आणि एका गीतकाराला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने 5 कोटींच्या खंडणीची धमकी मिळाली होती. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये 2 कोटींच्या खंडणीची मागणी करणारी धमकी आली होती. या सर्व धमक्यांमुळे सलमानच्या सुरक्षेत सातत्याने वाढ करण्यात आली आहे. (हेही वाचा – बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाचे वेध ; वाचा काय आहेत नवीन अपडेट)
आता पुन्हा सलमान खानला त्यांच्या गाडीत बॉम्ब ठेऊन उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. वरळी पोलिसांनी या धमकीनंतर तातडीने तपास सुरू केला आहे. सूत्रांनुसार, पोलिस धमकीच्या संदेशाचे आयपी अॅड्रेस आणि आरोपीच्या मोबाइल क्रमांकाचा मागोवा घेत आहेत. तसेच सलमानच्या सुरक्षेत कोणतीही तडजोड न करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. (हेही वाचा – ब्रेकिंग : ‘ईव्हीएम हॅक करून निकाल बदलता येतो’, अमेरिकेच्या गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड)