जुन्नर : राज्य सरकारने मॉल्समध्ये मद्य विक्री करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा, अशी मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने राज्य सरकारकडे केली आहे.
जनवादी महिला संघटनेने म्हटले आहे की, राज्याची बिघडलेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने किराणा दुकानांना मद्य विक्री करण्याची परवानगी देण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत दुर्दैवी आणि दात कोरून पोट भरणारा आहे. वाईन म्हणजे दारू नव्हे असल्या तकलादू समर्थनाने तो अधिकच हास्यास्पद झाला आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी निर्णयच घ्यायचा तर तो कृषी उत्पन्न बाजार समित्या बळकट करून आणि शेतमालाला रास्त हमीभाव देऊन जास्त फायदा होईल की असल्या साफ चुकीच्या उपायांनी? असाही सवाल केला आहे.
कोरोनाचे निर्बंध हटविण्यास सुरूवात, राज्य सरकारने केली नवीन नियमावली जाहीर
मुळातच नवऱ्याच्या दारू पिण्याने आजवर लाखो महिलांचे आयुष्य आणि संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यात कोरोना काळात तर सुरुवातीला दारू मिळत नव्हती म्हणून आणि नंतर मिळायला लागल्यावर या दोन्ही परिस्थितीत महिलांच्या त्रासाला पारावार उरला नाही. आता किराण्यासारख्या अत्यावश्यक वस्तूंत दारूचा समावेश झाल्याने, केवळ दारू पिऊनच नव्हे तर ती आणण्यासाठी देखील महिलांवर दबाव येणार. अपुऱ्या कमाईत जेमतेम संसाराचा गाडा ओढताना त्यात नवऱ्याचे व्यसन त्या कसे सांभाळणार? असेही म्हटले आहे.
संघटनेने म्हटले आहे की, या निर्णयाला आमचा तीव्र विरोध असून असले जीवघेणे उपाय करण्यापेक्षा महसूल वाढवण्यासाठी श्रीमंतांवर कर वाढवण्याचे ठोस उपाय उचलावेत, आणि मॉल्स मध्ये मद्यविक्रीचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी राज्य सरकारकडे राज्य अध्यक्ष नसीमा शेख, राज्य सचिव प्राची हातिवलेकर यांनी केली आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला मध्ये विविध पदांच्या ११४९ जागा! आजच अर्ज करा!
ब्रेकिंग : देशाचे अर्थसंकल्प सादर, अर्थसंकल्पाने जनतेला काय दिले वाचा एका क्लिकवर !
पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट करा LIC ची ‘ही’ पॉलिसी, रोज केवळ 30 रुपये जमा करा !