मुंबई : माळशेज घाटातील निसर्ग सौंदर्याची भुरळ फक्त महाराष्ट्रच नाही, तर देशभरातील पर्यटकांना पडली आहे. माळशेजचं हे सौंदर्य आता जगाच्या नकाशावर आणण्याच्या हालचाली सुरु आहेत. लवकरच माळशेज घाटात देशातला पहिला पारदर्शक पूल (वॉक वे) बांधण्यात येणार आहे.
माळशेज घाटातील 700 मीटर खोल दरीवर 18 मीटर लांबीचा पारदर्शक वॉक-वे बांधण्याचा प्रस्ताव ठाणे जिल्हा प्रशासनाने मांडला आहे. प्रस्ताव आणि बजेटला मंजुरी मिळाल्यास येत्या तीन वर्षांत हे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल. तसं झाल्यास हा देशातील पहिला पारदर्शक पूल ठरेल.
मनरेगा अंतर्गत कार्यरत असणारे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ सोडवा – किसान सभेची मागणी
कल्याण-अहमदनगर हायवेवर माळशेजमध्ये एमआरटीडीसीचं रिसॉर्ट आहे. त्याच्या जवळच माळशेजच्या दरीलगत दुमजली इमारत बांधण्यात येणार असून त्यावर हा पारदर्शी वॉक वे असेल. 18 मीटर लांबीचा यू-शेप वॉक वे बांधण्याची प्रशासनाची योजना आहे. वॉक वेचं फ्लोरिंग पारदर्शी (काचेचं) असेल.
या वॉक वे वरुन चालताना पर्यटकांना हवेत चालण्याचं थ्रिल अनुभवता येईल. खोल दरीचा नयनरम्य नजारा पाहता येईल आणि अर्थात डेकवर (काळजी घेऊन) फोटो काढण्याचीही मुभा असेल.
तमाशा कलावंत शासनाच्या अनुदानापासून वंचित, केल्या ‘या’ मागण्या
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने दोन टप्प्यात ही योजना प्रत्यक्षात आणायची आहे. पहिल्या टप्प्यात वॉक वेचं बांधकाम, तर दुसऱ्या टप्प्यात आर्ट गॅलरी, अॅम्पिथिएटर, म्युझिकल फाऊण्टन्स याची रचना करायची आहे.
माळशेज घाट पावसाळ्यात पर्यटकांनी फुललेला असतोच, मात्र वॉक वे बांधल्यावर वर्षाचे 365 दिवस इथे पर्यटकांची गर्दी होईल. जिल्ह्याच्या महसूलात वाढही होईल आणि जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळही विकसित होईल, असं दुहेरी उद्दिष्ट आहे.
अनुसूचीत जमातीतील जनतेच्या धर्मांतराच्या तक्रारीसंदर्भात चौकशी होणार !
पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार !