“उद्योगाच्या मागणी प्रमाणे कामगार प्रशिक्षित करणे हि काळाची गरज”
नाशिक : भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे आझादी का अमृत महोत्सव (AKAM) म्हणून साजरी केली जात आहे. AKAM च्या स्मरणार्थ आणि आयकॉनिक ठीक 7 ते 13 मार्च, 2022, भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दत्तोपंत ठेंगडी नॅशनल बोर्ड फॉर वर्कर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट, प्रादेशिक संचालनालय, नाशिक यांनी भारतीय मजदूर संघच्या संयुक्त विद्यमाने साजरा करताना 9 मार्च 2022 रोजी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील औद्योगिक कामगार आणि कामगार संघटनांची भूमिका या विषयावर एक दिवसीय विशेष कार्यक्रम आयोजित केला होता.
सर्व मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले आणि आपापल्या भाषणात भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षात एक अभिमानास्पद भारतीय असल्याबद्दल प्रत्येकाचे अभिनंदन केले आणि असंघटित क्षेत्राच्या उन्नतीसाठी DTNBWED, नाशिकच्या कार्याचे कौतुक केले.
पिवळी रेषा रेखांकन न करणाऱ्या शाळांवर कारवाई करणार – राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे खासदार हेमंत गोडसे यांनी उपस्थिताना संबोधित करुन कामगार शिक्षण योजनेसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला. असंघटित कामगारांच्या नोंदणीच्या कामाला गती द्यावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात मांडण्यात आलेल्या समस्या शासना समोर मांडण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
डीटीएनबीडब्ल्यूईडी प्रादेशिक संचालनालय, नाशिक कार्यालय मार्फत कर्नल अजय कश्यप आणि माजी सैनिक जंबक कानडे यांचा खा.गोडसे यांच्य हस्ते मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. नाशिक जिल्हा महिला सहकारी बँक चे अध्यक्ष डॉ. शशी अहिरे यांनी महिलांना कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्यांवर चर्चा करताना विशेषतः नाशिकमध्ये महिलांसाठी अधिकाधिक स्वच्छतागृहांची गरज मांडली.
अनुसूचीत जमातीतील जनतेच्या धर्मांतराच्या तक्रारीसंदर्भात चौकशी होणार !
महाराष्ट्र राज्य सरकार कर्मचारी राष्ट्रीय महासंघाचे निमंत्रक व्ही.जी.पेंढारकर यांनी संबोधित करताना स्व. दत्तोपंत ठेंगडीजी यांचे ट्रेंड युनियत चळवळीतील योगदान तपशीलवार वर्णन केले. AITUC चे राज्य सचिव राजू देसले यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील कामगार आणि कामगार संघटनांच्या भूमिकेवर उपस्थितांना संबोधित केले.
हिंदुस्तान हार्डी स्पायसर लि. चे कार्यकारी संचालक आणि सीईओ विजय पाठक यांनी DTNBWED, नाशिकने संघटित क्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक करताना कामगारांना अधिकाधिक प्रशिक्षण देण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमात पाहुण्यांसह एकूण 46 जण सहभागी झाले होते. डीटीएनबीडब्ल्यूईडी नाशिकच्या प्रभारी प्रादेशिक संचालिका श्रीमती. सारिका डफरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व नाशिक कार्यालयाच्या कामाचा आढावा घेतला.
तमाशा कलावंत शासनाच्या अनुदानापासून वंचित, केल्या ‘या’ मागण्या
परीधा वेल्फेअर फाउंडेशन अध्यक्षा श्रीमती मीनाक्षी पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. बीएमएसचे उपाध्यक्ष अशोक सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.