Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीयव्हिडिओ : भारतीय सैनिकांना घेऊन जाणारे वाहन नदीत पडले, आतापर्यंत 7 जणांचा...

व्हिडिओ : भारतीय सैनिकांना घेऊन जाणारे वाहन नदीत पडले, आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू

लडाख : लडाख प्रदेशात २६ सैनिकांना घेऊन जाणारे भारतीय लष्कराचे वाहन श्योक नदीत पडले. या अपघातात सात जवानांचा मृत्यू झाला. २६ जवानांचे पथक परतापूरच्या संक्रमण शिबिरातून उप-सेक्टर हनिफच्या फॉरवर्ड एरियाकडे जात होते. 

सविस्तर वृत्त असे की, रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास थॉईसपासून सुमारे २५ किमी अंतरावर वाहन रस्त्यावरून घसरून श्योक नदीत पडले. वाहन सुमारे ५० ते ६० फूट खाली पडले. सर्व २६ जवानांना परतापूर येथील ४०३ फील्ड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर लेहहून परतापूरला सर्जिकल टीम पाठवण्यात आली. आतापर्यंत ७ जवानांना मृत घोषित करण्यात आले आहेत. 

इतर जवानही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उत्तम वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी लष्कराकडून प्रयत्न सुरू आहेत. ज्या जवानांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना हवाई मार्गाने हलवण्यात येत आहे. याबाबतचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

उत्तरकाशी मध्ये महाराष्ट्रतील गाडीचा भीषण अपघात !

भीषण अपघात : 20 फूट खोल दरीत एसटी बस घसरली

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे रिक्त पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !


संबंधित लेख

लोकप्रिय