पिंपरी चिंचवड : पुणे जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येमुळं जिल्ह्याचं विभाजन करण्यात यावं, त्यामुळं पिंपरी चिंचवडच्या बाजुच्या भागासाठी वेगळा जिल्हा निर्माण करावा आणि त्या जिल्ह्याला शिवनेरी असं नाव द्यावं, अशी मागणी भाजप आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. विविध विकासकामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमात बोलताना असताना लांडगे यांनी वेगळा जिल्हा करण्याची मागणी केली आहे.
यावेळी बोलताना लांडगे म्हणाले, पिंपरी चिंचवड शहर जसं मोठं झालंय, तसा जिल्हा पण मोठा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याचं पण विभाजन करावं. पिंपरी चिंचवडच्या बाजुच्या भागाला वेगळं करून त्या जिल्ह्याला शिवनेरी असं नाव द्यावं, आम्हाला त्याचा सर्वात जास्त अभिमान वाटेल, असेही लांडगे म्हणाले.