Saturday, December 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडशिक्षक अशक्याला शक्य करू शकतात - आंतरराष्ट्रीय प्रख्यात व्यवसायिक भरत वोरा

शिक्षक अशक्याला शक्य करू शकतात – आंतरराष्ट्रीय प्रख्यात व्यवसायिक भरत वोरा

चिंचवड : चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज, प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालय, प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालय, प्रतिभा इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘’73 वा प्रजासत्ताक दिन” साजरा करण्यात आला. 

आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रख्यात व्यवसायिक भरत वोरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते उपस्थित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना आपल्या मनोगतात बोलत होते. 

भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचे खास डूडल पाहिले का?

यावेळी व्यासपीठावरती कमला शिक्षण संकुलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, डॉ. पोर्णिमा कदम, संचालक डॉ. सचिन बोरगावे, प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, डॉ. वनिता कुर्‍हाडे, मुख्याध्यापिका डॉ. सविता ट्रॅव्हीस उपस्थित होते. संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा याच्या हस्ते उद्घाटक भरत वोरा यांचा स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. 

मार्गदर्शन करताना प्रख्यात व्यवसायिक भरत वोरा म्हणाले, शिक्षकांना मार्गदर्शन करण्या इतका मी, मोठा नसून आपण सर्व विद्यार्थ्यांना ज्ञान देणारे आहात, माझे शालेय शिक्षण घेत असताना वर्गात मी, हुशार न्हवतो इयत्ता 3 री. व 4 थी. मध्ये नापास झालो होतो. नेहमी मागील बाकड्यावर बसत असे, हे माझ्या शिक्षकांनी हेरून मला त्यावेळी पुढील बाकावर बसविले.

ब्रेकिंग : राष्ट्रवादीचे काँग्रेसला मोठे खिंडार, माजी आमदारसह २७ नगरसेवकांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

शिक्षकांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासामुळेच मी झपाट्याने शैक्षणिक क्षेत्रात मी, प्रगती करू शकलो. अशा आदर्श शिक्षकांमुळेच मी पदवी प्राप्त करून व्यवसायात प्रवेश करून आज यशस्वी झालो असलो तरी, शिक्षकांमध्ये अशक्याला शक्य करण्याची ताकद असते अशा शिक्षणामुळेच मी घडलो. आपणही विद्यार्थ्यांना धाकात न ठेवता प्रेम, आदर्शाच्या जोरावर त्यांना उत्तम नागरीक घडवू शकता. कुंभार जसा मातीला आकार देवून शिल्प बनवतो तसे आपण शिक्षकही विद्यार्थ्यांसाठी कुंभार आहात त्यांना कसा आकार द्यायचा हे तुम्हीच ठरवू शकता, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविकात संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा म्हणाले, योग्य, अचूक शिक्षणामुळेच उद्याची आदर्शपिढी विद्यार्थ्यांमधून निर्माण होणार आहे. त्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा. आज आव्हाने आहेत, पण कष्ट करण्याचीही तयारी दाखविली पाहीजे. अल्पावधीतच आपली संस्था नावारुपाला आली. हे प्रत्येकांनी केलेल्या परिश्रमामुळेच शक्य झाले आहे. यावेळी विशेष नैपुण्ये, कामगिरी बजावलेल्या संस्थेतील प्राध्यापक, शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांना व्यवसायिक भरत वोरा डॉ. दीपक शहा, डॉ. सचिन बोरगावे आदींच्या हस्ते धनादेश भेट वस्तू देवून सत्कार करण्यात आला.

संतापजनक : सामूहिक बलात्कार पीडितेचा चप्पलचा हार घालून परिसरातून धींड

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सुवर्णा गोगटे, प्रा. तुलीका चटर्जी यांनी केले. आभार प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे यांनी मानले. प्रजासत्ताक दिन यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक डॉ. आनंद लुंकड, शबाना शेख, प्रा. पी.टी. इंगळे, प्रा. अश्लेषा ढोले, प्रा. रुतुजा चव्हाण, संदीप शहा, भूषण पाटील, इक्बाल सय्यद आदींनी विशेष परिश्रम घेतले.

– क्रांतिकुमार कडुलकर

इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या १३७ जागांसाठी भरती

बँक ऑफ बडोदा येथे 220 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा!

मोबाईल खरेदी करताय ? ‘या’ कंपनीनं आणला 8,499 रुपयांमध्ये स्वस्त फोन, 6,000 mAh बॅटरी पाच दिवस चालणार चार्जिंगविना

संबंधित लेख

लोकप्रिय