शिक्षण व रोजगाराच्या हक्कासाठी संघर्षासाठी तयार व्हा ! – प्रा. संजय साबळे
अध्यक्षपदी अक्षय साबळे, तर सचिवपदी अक्षय घोडे यांची एकमताने निवड
जुन्नर : स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडियाचे १९ वेळ जुन्नर तालुका अधिवेशन आज (दि.९) प्रभाकर संझगिरी स्मृती भवन, जुन्नर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. अधिवेशनाचे उद्घाटन प्रा. संजय साबळे यांनी केले.
यावेळी बोलताना प्रा. साबळे म्हणाले, “आज देशात लाखोंच्या संख्येने सुशिक्षित तरूण आहेत, परंतु आपले केंद्र आणि राज्य सरकार त्यांना शाश्वत असा रोजगार देऊ शक्य नाही, ही मोठी शोकांतिका आहे. तरूणांना शिक्षण आणि रोजगाराच्या हक्कासाठी संघर्ष करण्याची गरज आहे. कारण सरकार कोणतेही असले तरी जनसामान्यांचे प्रश्नांकडे नेहमी दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे सर्व जातीधर्मातील तरुणांनी एकजूट होण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. तसेच विलास साबळे यांनी “अब की बार, सिर्फ रोजगार” या विषयावर मार्गदर्शन केले.
डॉ. अशोक ढवळे यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोवर निवड
त्यानंतर तालुका सचिव प्रविण गवारी यांनी त्रेवार्षिक अहवाल अधिवेशनासमोर मांडला. तसेच नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा, स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधी लढा तीव्र करा, आदिवासी आश्रम शाळा व वस्तिगृह विरोधी लढा तीव्र करा, तसेच आदिवासी विशेष पद भरती लवकर सुरू करा आदी ठराव एकमताने पारित करण्यात आले.
यावेळी १५ जणांची नवीन तालुका कमिटी निवडण्यात आली. तर तालुका अध्यक्ष पदी अक्षय साबळे, तर तालुका सचिव पदी अक्षय घोडे यांची एकमताने निवड करण्यात आली.
पुणे : सिटू संलग्न जुन्नर तालुका अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मेळावा संपन्न
यावेळी पुणे जिल्हा सचिव रवी साबळे, राज्य समिती सदस्य राजू शेळके, जिल्हा कोषाध्यक्ष सचिन साबळे, दादाभाऊ साबळे, महेश गाडेकर, दिवक लाडके, संदीप मरभळ, अनिल शेळके यांसह ५० प्रतिनिधी उपस्थित होते.
नवनिर्वाचित तालुका समिती पुढीलप्रमाणे :
अध्यक्षपदी अक्षय साबळे, सचिवपदी अक्षय घोडे, उपाध्यक्षपदी निशा साबळे, सहसचिवपदी विशाल सुरकुले, कोषाध्यक्ष पदी भूषण पोफळे, सचिवमंडळ सदस्य पदी सुवर्णा साबळे, तर सदस्य पदी विनायक नाडेकर, संज्योत दिवटे, प्रज्वल करवंदे, अजय मुंढे, सुवर्णा दुधवडे, मीना शिंदे, उषा लांघी, विशाल हागवने, रवी भोईर यांची तालुका समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
आयटीआय पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ! पूर्व रेल्वेमध्ये 2972 जागांसाठी बंपर भरती