कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे. कोल्हापूरतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.
शेतीसाठी दिवसा दहा तास वीजपुरवठा मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील महावितरणच्या मुख्य कार्यालयाजवळ आंदोलन करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून या धरणे आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त अज्ञात शेतकऱ्यांनी कागल महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय पेटविले. असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ट्वीट करून म्हटले आहे. तसेच हा आग लावल्याचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
रशिया युक्रेनच्या युध्दाचा सोने-चांदीवर परिणाम, “इतक्या” वाढल्या किंमती
शेतकऱ्यांना दिवसा वीज व महावितरणच्या भ्रष्ट कारभाराविरोधात स्वाभिमानीचे आंदोलन पेटले.#कोल्हापूर येथील #महावितरण कार्यालयासमोर मा.खा.@rajushetti यांच्या धरणे आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने संतप्त अज्ञात शेतक-यांनी कागल महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय पेटविले. pic.twitter.com/ARLO5pNRhc
— स्वाभिमानी शेतकरी संघटना अधिकृत (@swabhimani7227) February 24, 2022
दरम्यान, या आगीची माहिती मिळताच छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या गाड्या आणून आग आटोक्यात आणण्यात आली.
दहावी पास उमेदवारांसाठी संधी ! इंडियन बँकेत विविध पदांसाठी भरती
अष्टविनायक गणपती दर्शन हेलिकॉप्टरद्वारे फक्त काही तासांत
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या “या” मागण्या मान्य, कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे