दोषी व बोगस अधिका-यांवर कारवाईची मागणी
रत्नागिरी : दोषी, बोगस अपंग प्रमाणपत्र धारक विजय दाजी बाईत तत्कालीन व बोगस डिग्री धारक, दोषी नंदलाल कचरू शिंदे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली या दोन्ही बोगस विस्तार अधिका-यांना आणि 31 दोषारोपीत एकनाथ आंबोकर तत्कालीन शिक्षणाधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करा व माझी उर्वरीत 2 मूळ कागदपत्रे 2 लाख दंडाच्या रकमेसह परत करा तसेच 28 मागण्यांच्या तात्काळ पूर्तता करा, या मागणी साठी जिल्हा परिषद आदर्श शाळा सुकदरचे शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी प्रजासत्ताक दिनी आपले 200 वे उपोषण जिल्हा परिषद रत्नागिरी येथे केले. विशेष म्हणजे हे 200 वे उपोषण असून प्रशासन व सरकार याकडे लक्ष देण्यास तयार नाही.
पावरा यांच्या प्रकरणात आयुक्त, राज्य माहिती आयोग कोकण खंडपीठ यांच्या दिनांक 2 नोव्हेंबर 2015 रोजीच्या आदेशान्वये जिल्हा परिषद रत्नागिरीला 2 लाख दंड ठोठावलेला आहे. तरी त्या आदेशाची अद्याप अंमलबजावणी करण्यात आली नाही. आदेशानूसार अजूनही काही मूळ कागदपत्रे शिक्षक पावरा यांना देण्यात आली नाहीत.
ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांचे निधन
उपोषणाच्या निवेदनात म्हटले आहे की, विजय दाजी बाईत शिक्षण विस्तार अधिकारी दापोली हे जिल्हा बदली शिक्षकांकडून प्रत्येकी 22,000 रूपये घेणे, कामाच्या बदल्यात आर्थिक मागणी करणे, स्वत: कुठल्याही प्रकारे अपंग नसून खोटे अपंग प्रमाणपत्र मिळवून अनेक शासकीय योजनांचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक करणे, षडयंत्र प्रकरणात स्वत: ला वाचविण्यासाठी आदिवासी शिक्षकांकडून स्वत लिहून ठेवलेल्या पत्रावर व बान्ड पेपरवर जबरदस्तीने दमदाटी करून सह्या करवून घेणे, जाणीवपूर्वक शिक्षकांचा पगार न काढणे इत्यादीं गंभीर प्रकरणात दोषी ठरले आहेत.
तसा चौकशी अहवाल गटविकास अधिकारी दापोली, गटविकास अधिकारी गुहागर, शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी या त्रिसमीतीय सदस्य समितीने दिनांक 4 ऑक्टोबर 2018 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना सादर केलेला आहे. त्यांच्या विरोधातल्या दिनांक 4 जुलै 2018 व दिनांक 29 ऑक्टोबर 2018 रोजीच्या दोन्ही चौकशीत चौकशी समितीने विजय दाजी बाईत यांना दोषी ठरवले आहे. विजय दाजी बाईत यांच्या विरोधातल्या 4 जुलै 2018 रोजीच्या चौकशीच्या अनुषंगाने काही अधिकारी, समाजकंटकांनी व राजकीय पदाधिकारी यांनी मला खोट्या गुन्ह्यात अडकवले आहे. सदर षडयंत्रात प्रामुख्याने विजय दाजी बाईत हे सहभागी आहेत.
ब्रेकिंग : माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्मभूषण पुरस्कार नाकारला !
एकनाथ आंबोकर तत्कालीन शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या वर दोषी, भ्रष्टाचारी व बोगस अधिका-यांना पाठीशी घालणे, शिक्षक कर्मचा-यांचा छळ करणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे, जातीभेद करणे, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी इत्यादी वरिष्ठ अधिका-यांचे आदेश दडपून ठेवणे, शिक्षक सुशिलकुमार पावरा यांचे मूळ कागदपत्रे लपवून ठेवणे,दिशाभूल करणारे पत्रव्यवहार करणे, माहिती अधिकार अर्ज कोर्ट टिकीटसह फाडणा-या दोषी अधिका-यांना वाचवणे,बोगस प्रमाणपत्र धारकांना अभय देणे, आरोपीलाच चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करणे इत्यादी 31 प्रकारचे गंभीर दोषारोप करण्यात आले आहेत.
नंदलाल कचरू शिंदे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली यांची आग्रा विद्यापिठाची डिग्री शिक्षण विस्तार अधिकारी पदाधिकारी अवैद्य ठरविण्यात आली आहे. तसा चौकशी अहवाल तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी रत्नागिरी यांनी दिलेला आहे. तसेच नंदलाल शिंदे हे महिला कर्मचा-यांचा छळ करणे,अनेक शिक्षकांना त्रास देणे व बोगस डिग्रीत दोषी ठरले असून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते.
इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये १३७ जागांसाठी भरती
जोपर्यंत मला न्याय मिळत नाही व दोषी बोगस विस्तार अधिका-यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत माझे उपोषण मी सुरूच ठेवणार आहे. माझी 200 वे उपोषण जरी आज पूर्ण होत आली तरी मी यापुढेही माझा लढा असाच सुरू ठेवणार आहे. अशी प्रतिक्रिया उपोषण कर्ते शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी व्यक्त केली आहे.
एवढी वेळा उपोषण करूनही शिक्षक सुशिलकुमार पावरा यांच्या मागण्यांकडे जिल्हा परिषद रत्नागिरी प्रशासन दुर्लक्ष करत आहे म्हणून लोकांमध्ये संताप निर्माण होत आहे. आदिवासी संघटनांनी तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा दिला आहे.
गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा