नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) रुग्णालयातून नवजात बाळ चोरीच्या घटनांवर कठोर पाऊल उचलत, अशा रुग्णालयांचा परवाना तातडीने रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. उत्तर प्रदेशातील एका बाल तस्करी प्रकरणात सुनावणी करताना न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने हा ऐतिहासिक निर्णय दिला.
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश | Supreme Court
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आपल्या आदेशात स्पष्ट केले की, “जर एखाद्या रुग्णालयातून नवजात बाळ चोरीला गेले, तर त्या रुग्णालयाचा परवाना तात्काळ निलंबित केला पाहिजे. जेव्हा एखादी महिला प्रसूतीसाठी रुग्णालयात येते आणि तिचे बाळ चोरीला जाते, तेव्हा पहिली कारवाई म्हणजे रुग्णालयाचा परवाना निलंबित करणे.” हा आदेश उत्तर प्रदेशातील एका प्रकरणाशी संबंधित आहे, ज्यामध्ये नवजात बाळ चोरीला गेल्याचा आरोप आहे. या प्रकरणात, एका जोडप्याने ४ लाख रुपयांना चोरीचे बाळ विकत घेतल्याचा धक्कादायक खुलासा झाला. (हेही वाचा – मोफत अन्नधान्य योजनेमुळे शेतात मजूर मिळत नाही, मोफत योजना बंद करा – भाजप आमदार सुरेश धस)
न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या जामीन निर्णयावरही ताशेरे ओढले, ज्यामुळे या प्रकरणातील अनेक आरोपी फरार झाले. न्यायालयाने म्हटले, “अलाहाबाद उच्च न्यायालयाने जामीन अर्जांवर हलगर्जीपणे निर्णय घेतले, ज्यामुळे अनेक आरोपी फरार झाले. असे आरोपी समाजासाठी धोका आहेत.” न्यायालयाने उच्च न्यायालयांना निर्देश दिले की, बाल तस्करीच्या प्रकरणात जामीन देताना कठोर अटी लावाव्यात, जसे की, आरोपीने दर आठवड्याला पोलिस ठाण्यात हजेरी लावणे. (हेही वाचा – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत 493 जागांसाठी भरती)
हे प्रकरण उत्तर प्रदेशातील एका रुग्णालयातून नवजात बाळ चोरीला गेल्याच्या घटनेशी संबंधित आहे. तपासात असे समोर आले की, चोरलेले बाळ ४ लाख रुपयांना एका जोडप्याला विकले गेले, ज्यांना मुलगा हवा होता. सर्वोच्च न्यायालयाने यावर तीव्र आक्षेप घेत म्हटले, “ज्यांना मुलगा हवा आहे, ते चोरलेले बाळ खरेदी करू शकत नाहीत. अशा व्यक्तीला बाळ चोरीचे माहीत असतानाही त्याने खरेदी केली, हे गंभीर आहे.”
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात केवळ रुग्णालयांवरच कारवाईचे निर्देश दिले नाहीत, तर देशभरातील बाल तस्करीच्या प्रकरणांवर व्यापक उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत. (हेही वाचा – महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याला एका झाडाने रात्रीतून केले करोडपती)
बाल तस्करीची गंभीर समस्या
भारतात बाल तस्करी ही एक गंभीर समस्या आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो (NCRB) च्या २०२३ च्या अहवालानुसार, देशात दरवर्षी सुमारे १,५०० ते २,००० बाल तस्करीच्या घटना नोंदवल्या जातात, परंतु वास्तविक आकडा यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. रुग्णालयातून नवजात बाळ चोरीच्या घटना विशेषतः उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये जास्त नोंदवल्या गेल्या आहेत. या बाळांना बेकायदा दत्तक प्रक्रिया, जबरदस्तीने मजुरी किंवा इतर अवैध कामांसाठी विकले जाते. (हेही वाचा – लाडक्या बहीणींना धक्का ; आता 1500 नव्हे तर फक्त 500 रुपयेच मिळणार)