Tuesday, June 18, 2024
Homeताज्या बातम्याSunetra Pawar : सुनेत्रा पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी

Sunetra Pawar : राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल पटेल यांची जागा रिक्त झाली आहे. रिक्त झालेल्या या जागेवर कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या जागेसाठी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार, पत्नी सुनेत्रा पवार तसेच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची नावे चर्चेत होती. अखेर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली असून आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावरून मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजीनाट्य सुरु असल्याचे बोलले जात होते. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरून नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आता नाराजीवर खुद्द छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, अरे मी नाराज वगैरे नाहीये. आता पुढे बजेट सादर होणार आहे. काय काय करायचं थोडीशी चर्चा झाली पाहिजे. मी बिल्कुल नाराज नाहीये. माझ्या तोंडावर दिसतंय का मी नाराज आहे?, असा प्रतिसवाल छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला आहे.

पुढे भुजबळ म्हणाले की, सुनेत्रा पवारांना राज्यसभेसाठी उभे करायचे आहे, असा निर्णय सर्वानुमते झालेला आहे. मी या निवडणुकीसाठी इच्छुक होतो, माझ्यासोबत आनंद परांजपे, बाबा सिद्धीची देखील इच्छुक होते. मात्र चर्चेअंती सर्वानुमते सुनेत्रा पवार यांना राज्यसभेसाठी उभे करण्याचा निर्णय घेतला.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : अयोध्येतून विजयी झालेल्या सपा खासदाराचा राजीनामा

सीमा सुरक्षा दल अंतर्गत मोठी भरती; पात्रता 10वी/12वी/पदवी/ITI/नर्सिंग/डिप्लोमा

सरकार स्थापनेनंतर रेशन कार्ड धारकांना आनंदाची बातमी, सरकारकडून “हा” मोठा निर्णय

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली, मध्यरात्री लावले सलाईन

कंगना आणि मी पती-पत्नी सारखे राहिलो, अभिनेत्याचा मोठा खुलासा

चालू कार्यक्रमात रजत शर्मा यांच्याकडून काँग्रेसच्या महिला प्रवक्त्यांना शिवीगाळ

ब्रेकिंग : केंद्रीय मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर, वाचा कुणाला मिळाले कोणते खाते ?

मोठी बातमी : शाळकरी मुलांसाठी ‘एक राज्य एक गणवेश’ योजना लागू होणार

Manipur : अस्वस्थ मणिपूर, शांत करा, संघाचा (RSS) केंद्र सरकारला इशारा?

Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती

मोठी बातमी : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर हल्ला

ब्रेकिंग : ममता बॅनर्जी यांचा मोठा दावा काही दिवसांत इंडिया आघाडीचे सरकार

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय